शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी शिरलेल्या घरांना नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील नदी व खाडी किनारी राहणाऱ्या तसेच सखल भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी ...

कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील नदी व खाडी किनारी राहणाऱ्या तसेच सखल भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून झालेल्या नुकसानाचे तहसील कार्यालयाने पंचनामे करून त्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली.

डोंबिवली खाडी परिसर, मोठा गाव ठाकुर्ली, कोपर परिसरासह कल्याण खाडीलगत असलेला रेतीबंदर परिसर, वालधुनीनजीक असलेल्या योगीधाम, अनुपमनगर, कल्याण पूर्व भागातील कैलासनगर, अशोकनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. त्यांच्या गृहोपयोगी वस्तू, विजेवर चालणारी उपकरणे आदीचे मोठे नुकसान झाले. आधीच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले. त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी तहसील कार्यालयाने त्या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करावे. अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकारला द्यावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली.

यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता, पावसामुळे घरांचे नुकसान झाले असले तरी यापुढेही पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र येत्या सोमवारपासून पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत.

........

कल्याण-डोंबिवली शहराला २०१९ साली अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला होता. त्यावेळी तहसील कार्यालयातर्फे पंचनामे करण्यात आले होते. मात्र नुकसानग्रस्त घरांपैकी केवळ ३० टक्के लोकांना आर्थिक भरपाई मिळाली होती. उर्वरित ७० टक्के नागरिकांना भरपाई मिळालीच नाही. मागील नुकसान भरपाईची रक्कम आणि आता झालेल्या नुकसानीची रक्कम दोन्ही द्यावी, असे म्हात्रे म्हणाले.

----------------------------------

वाचली