शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरवासीयांचे पाणी महागणार?; अर्थसंकल्प ‘स्थायी’ला सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:49 IST

मालमत्ता करातही सुचविण्यात आली वाढ

उल्हासनगर : महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी २०२१-२२ या वर्षाचा ४३० कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समिती सभापती विजय पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता, पाणीपट्टी करात दरवाढ सुचविण्यात आली आहे.उल्हासनगर महापालिका उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असून उत्पन्न वाढीसाठी महापालिका प्रशासन तसेच  सत्ताधारी, विरोधी पक्ष अपयशी ठरल्याची टीका सर्वस्तरातून  होत आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही मोठी योजना वा नावीन्यपूर्ण उपक्रम नाही. उत्पन्न वाढीसाठी नेहमीप्रमाणे आयुक्तांनी मालमत्ता व पाणीपट्टी कर दरवाढीचे संकेत दिले आहेत. उत्पन्नात १४३ कोटी मालमत्ता कर व पाणीपट्टी, १२ कोटी नवीन बांधकाम परवाने, २६० कोटी सरकारकडून मिळणारे जीएसटी अनुदान व इतर २२ कोटी यांचा समावेश असेल. 

महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पातील खर्चामध्ये १४१ कोटी कर्मचाऱ्यांचा पगार व व्यवस्थापन खर्च, ७८ कोटी एमआयडीसीची पाणी बिलापोटीची रक्कम, ५२ कोटी रस्ते विकास, १० कोटी कचरा व्यवस्थापन, ३८ कोटी शिक्षण मंडळ विभाग, उद्यान विकासासाठी ३ कोटी असा एकूण खर्च ४३० कोटींचा  दाखविण्यात आला आहे. 

आरसीसी व गर्डर बांधकामासाठी दरमहा ६०० रुपये पाणीपट्टी दरवाढ सुचविण्यात आली. गेल्यावर्षी ही दरमहा ३०० रुपये आकारले जात होते. तर छत व पत्र्याच्या घराला दरमहा ५०० रुपये दरवाढ सुचविण्यात आली आहे.  गेल्यावर्षी हा दर २५० रुपये होता. तर झोपडपट्टीकरिता दरमहा १०० रुपयांची पाणीपट्टी ४०० रुपयांची सुचविली आहे. ही दरवाढ सत्ताधारी व विरोधी पक्षांनी मान्य केल्यास ५२ कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळू शकते, असे यावेळी सांगण्यात आले. 

अर्थसंकल्पातील ही प्रमुख वैशिष्ट्येशहरातील विद्युत व्यवस्थेच्या देखभालीसाठी ९ कोटी, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्याकरिता ५० लाख, रोबोद्वारे भुयारी गटाराच्या साफसफाईसाठी १ कोटी, माझी वसुंधरा उपक्रमासाठी २२ कोटी तर नवीन चार रुग्णालये बांधण्यासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना महामारीमुळे पाणीपट्टी व मालमत्ता करात दरवाढ मंजुरीला सत्ताधाऱ्यांनी नकारघंटा दिल्याचे बोलले जात आहे.