शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

उल्हासनगरात पाणीटंचाई पुन्हा उडणार हाहाकार?

By admin | Updated: March 21, 2017 01:40 IST

उल्हासनगरातील लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट पाणीपुरवठा होऊनही शहरात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. उल्हास नदीची पाणीपातळी

उल्हासनगरातील लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट पाणीपुरवठा होऊनही शहरात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. उल्हास नदीची पाणीपातळी गुरुवारी एक मीटरने खाली गेल्यावर, एमआयडीसीने पम्पिंग स्टेशनमधील मशीनमध्ये कचरा शिरू नये, म्हणून काही काळ पाणीउपसा बंद केला होता. यामुळे दोन दिवस पश्चिमेत पाणीटंचाई निर्माण झाली. असा प्रसंग पुन्हा ओढवू नये म्हणून, पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नियमित पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पाटबंधारे विभागाला नदीत वेळीच पाणी सोडण्याची विनंती केली.महापालिकेकडे स्वत:ची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे पाण्यासाठी पूर्णत: एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. याचा फायदा एमआयडीसी अधिकारी घेत आहेत. पाणीपुरवठ्याचा मुद्दा ऐरणीवर येताच ते थकीत पाणीबिलाचे कारण पुढे करतात. शहराला अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असा आरोप महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी करत आहेत. शहराला दररोज १२० ते १४० एमएलडी पाणीपुरवठा केला जात असून त्याचे बिल एमआयडीसी महापालिकेला पाठवत आहे. इतके पाणी मिळूनही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे पाणी जाते कुठे, असा प्रश्न महापालिका व नागरिकांना पडत आहे. शहरातील पाणीवितरण व्यवस्था ५० वर्षे जुनी आहे. पाणीगळतीचे प्रमाण ३० ते ३५ टक्के आहे. ३०० कोटींची पाणीवितरण योजना सात वर्षांपासून राबवली आहे. मात्र, काही कारणास्तव योजना रखडल्याने पाणीसमस्या कायम आहे.एमआयडीसीच्या पाले व जांभूळ जलसाठ्यातून शहराच्या पूर्वेला ३७, तर शहाड गावठाण जलसाठ्यातून पश्चिमेला ८५ ते ९० एमएलडी पाणीपुरवठा होतो. शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहत असल्याने त्याचा परिणाम पुढील दोन दिवस पाणीवितरणावर होतो. नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त तीन ते चार दिवस पाणी नागरिकांना मिळत आहे. मात्र, तेही अपुरे असल्याने नागरिकांत असंतोष आहे. आयुक्त निंबाळकर यांनी एमआयडीसीला पत्र पाठवून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे. या प्रकाराला जबाबदार धरण्याचा इशाराही दिला आहे.-सदानंद नाईक, उल्हासनगर