शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात पाणीगळती ३५ टक्क्यांवर

By admin | Updated: April 2, 2016 03:06 IST

शहरातील २८७ कोटींची पाणीपुरवठा योजना आठ वर्षांनंतरही अर्धवट आहे. ९० टक्के पाणीपुरवठा नव्याऐवजी जुन्या जलवाहिन्यांतून होत असल्याने ३५ टक्के गळती होत आहे.

- सदानंद नाईक,  उल्हासनगरशहरातील २८७ कोटींची पाणीपुरवठा योजना आठ वर्षांनंतरही अर्धवट आहे. ९० टक्के पाणीपुरवठा नव्याऐवजी जुन्या जलवाहिन्यांतून होत असल्याने ३५ टक्के गळती होत आहे. एकूणच पाणीवितरण योजना फसल्याची माहिती पालिका अधिकारी खाजगीत देत आहेत. उल्हासनगरातील जलवाहिन्या ५० ते ६० वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत. त्यावर झोपडपट्टी, इमारती उभ्या राहिल्या असून त्या गटार व नाल्यांतून गेल्या आहेत. त्याच्या गळतीचे प्रमाण ३५ टक्के आहे. संपूर्ण शहरात नव्याने जलवाहिन्या टाकून जलकुंभ उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने पाणीवितरण योजना मागील आठ वर्षांपासून राबवली जात आहे. या योजनेतून जलवाहिन्यांऐवजी थेट जलकुंभातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. १२६ कोटींची योजना २८७ कोटींवर गेली असून त्यातून १० टक्केही पाणीपुरवठा होत नसल्याचे उघड झाले आहे.शहरात नव्या जलवाहिन्या टाकून ११ उंच तर एक भूमिगत जलकुंभ योजनेंतर्गत उभारले आहे. तसेच पंपिंग स्टेशन बांधले आहे. ४५ हजार पाणीमीटर बसवली आहेत. दुर्दैवाने आठ वर्षांनंतरही योजनेचे काम अपूर्ण असल्याने पालिकेला जुन्याच जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. ऐन पाणीटंचाईच्या दरम्यान नव्या जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा झाला असता तर गळती कमी होऊन पाणीबाणी निर्माण झाली नसती, असे बोलले जात आहे. २८७ कोटींच्या योजनेव्यतिरिक्त बहुतांश नगरसेवकांनी आपल्या प्रभागात अत्यावश्यक कामाच्या नावाखाली कोट्यवधीच्या जलवाहिन्या नव्याने टाकल्या आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जलकुंभ भरतच नाही. नाइलाजाने थेट वाहिनीतून पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे पाणीवितरण असमान होत आहे. झोपडपट्टी भागात अर्धा तास तर उच्चभ्रूंच्या भागात दिवसाला दोन वेळा पाणीपुरवठा होत आहे. एमआयडीसीकडून अनियमित पाणीपुरवठा पाणीटंचाईच्या निषेधार्थ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेसह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवले. एमआयडीसीकडून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. तो सुरळीत करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच भातसातून २० एमएलडीसह वाढीव पाणीपुरवठ्याची ग्वाही दिली आहे.