शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

पाणीकपात आणखी एका दिवसाने वाढणार

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

पाण्याचा नियोजनाचा अभाव, वितरणातील त्रुटी, बेसुमार उपसा, पाणीकपात रद्द करण्यासाठी राजकीय दबाव आणि पाणी उचलण्याच्या कोट्याला फासलेला हरताळ

- मुरलीधर भवार,  कल्याणपाण्याचा नियोजनाचा अभाव, वितरणातील त्रुटी, बेसुमार उपसा, पाणीकपात रद्द करण्यासाठी राजकीय दबाव आणि पाणी उचलण्याच्या कोट्याला फासलेला हरताळ सध्याप्रमाणेच सुरू राहीला, तर मे महिन्यापासून पाणीपुरवठ्याची स्थिती आणखी गंभीर होण्याची, पाणीकपात तीनऐवजी चार दिवसांवर जाण्याची भीती आहे. सध्या जिल्ह्यात उल्हासनगरच्या अनेक भागात अवघे दोन दिवस पाणी मिळते, तर कल्याण-डोंबिवलीत तीन दिवसांची पाणीकपात लागू झाली आहे. मीरा-भाईंदरची कपातही गंभीर बनली आहे. बारवी आणि आंध्र धरणातील सतत घटणारा पाणीसाठा जूनपर्यंत पुरविण्यासाठी त्याच्या उपशावर निर्बंध घातले आहेत. कपात अंमलात आणली नाही, तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणी पुरेल, एवढेच पाणी दोन्ही धरणात आहे. या पाण्याचे नियोजन न केल्यास पाणी कपात वाढू शकते. वाढीव पाणी कपातीची शक्यता कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी नाकारली नाही. उल्हास नदीच्या पात्रातून पाण्याच्या मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलल्याचा ठपका स्टेम, केडीएमसी, एमआयडीसीवर ठेवण्यात आला आहे. कपात वाढल्याने या सर्व पाणी ग्राहक संस्थांवर पाणी कमी प्रमाणात उचलण्याचे निर्बंध लघू पाटबंधारे खात्याने घातले आहेत. कल्याणमध्ये रस्ता रोको कोळसेवाडी : कल्याण पूवेर्तील मिलिंद नगर परिसराला आठवडाभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयासमोर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास रस्ता रोको केला. माजी नगरसेवक प्रमोद पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारला. पालिकेचे कनिष्ठ अभियंता श्याम सोनावणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास घेटे यांच्या उपस्थितीत पिंगळे व नागरिकांची बैठक झाली. काटई ‘पूरमय’; एमआयडीसीची जलवाहिनी फुटलीकल्याण : कल्याण-शीळ मार्गावरील काटई येथे मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता एमआयडीसीची जलवाहिनी फुटली. त्यामुळे तासभर लाखो लिटर पाणी वाया गेले. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून एक हजार ७७२ मिली मीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे ठाण्याला पाणीपुरवठा होतो. मात्र, तीच फुटल्याने ठाण्याचा पुरवठा खंडित झाला.मध्यरात्री जलवाहिनी फुटली तेव्हा काटई येथील जलवाहिनी लगतचे किरकोळ दुकानदार व रहिवासी झोपेत होते. घरात पाणी शिरल्यानंतर जलवाहिनी फुटल्याचे त्यांना समजले. कल्याण-शीळ मार्गावर आतापर्यंत अनेकदा जलवाहिनी फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. जलवाहिन्या जुन्या झाल्याने त्या बदलल्या जातील, असे यापूर्वीच एमआयडीसीने सांगितले होेते. ‘कोकण किंग’ हॉटेलसमोर जुनी जलवाहिनी बदलण्याचे काम १२ मार्चला करण्यात आले होते. त्यानंतरही जलवाहिनी फुटली.काटई परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी नेताजी पाटील यांनी सांगितले की, जलवाहिनीवरून बेकायदा नळ जोडण्या घेण्यात आल्या आहेत. त्यांच्या टॅपिंगमुळेच जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सुरेश जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पाण्यावरून पक्षापक्षांत भांडणे पाणीटंचाई तीव्र होत गेल्याने आणि आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने सत्ताधारी-विरोधी नगरसेवक, राजकीय पक्षाच्या नेत्यांत भांडणे सुरू झाली आहेत. पाणी न मिळाल्याने नागरिक नगरसेवकांना जाब विचारत असल्याने नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे प्रकार जसे घडत आहेत, त्याचप्रमाणे शेजारच्या प्रभागात नीट पाणी मिळत असेल आणि आपल्या प्रभागात मिळत नसेल तर त्यातूनही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.मनसेच्या नगरसेविका तृप्ती भोईर यांच्या प्रभागात पाणी येत नाही. त्याची विचारणा करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांना उलटसुलट उत्तरे दिली गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या शेजारचा प्रभाग शिवसेनेच्या नगरसेविका निलिमा पाटील यांचा आहे. त्यांच्या प्रभागात पाणी येते. पाटील या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका असल्याने त्यांना पाणी दिले जाते, असा थेट आरोप भोईर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंता जुनेजा यांच्याकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. उल्हासनगरमध्येही पाणीच पाणीउल्हासनगर : शहरातील लालचक्की ते व्हिनस रस्त्यावर जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. वर्षानुवर्ष याची दुरूस्तीच केली नसल्याने सोमवारी अचानक जलवाहिनी फुटून रस्त्यावर पाणीच पाणी झाले. महिला पिण्याच्या एका हंड्यासाठी वणवण फिरत असतांना येथे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. स्थानिक नगरसेवक सुभाष मनसुलकर व त्यांचे सहकारी सुनिल तांबेकर यांनी पािलका कर्मचाऱ्यांच्या मदतीने जलवाहिनीची दुरस्ती केली आहे.पाण्यासाठी नागरिकांचे शटर डाऊन आंदोलनमुंब्रा : पाण्यासाठी मुंब्य्रातील नागरिकांनी मगळंवारी ठामपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाचे शटर डाऊन केले. काटई येथे एमआयडीसीची पाईपलाईन फुटल्यामुळे नियोजित पाणीकपात सुरु होण्या आधीच येथील काही भागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी हे आंदोलन केले. दरम्यान भूगर्भातील पाण्याचा वापर करता यावा, यासाठी काही प्रभागामध्ये वाजवीपेक्षा जास्त बोअरवेल खोदण्यात आल्या. तर काही प्रभागांमध्ये मात्र एकही बोरवेल खोदली नसल्याचा दावा समाजसेवक अजिज शेख यांनी केला. प्रशासनाच्या या कथित पक्षपाती धोरणाच्या विरोधात त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले.बेकायदा नळजोडण्या दंड आकारून नियमितकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बेकायदा नळ जोडण्यांची संख्या हजारो आहे. पण त्याचा नेमका आकडा महापालिकेकडे नाही. महापालिकेने नुकत्याच तीन हजार ५०० बेकायदा नळ जोडण्या अडीच पट दंड आकारून नियमित केल्या आहेत. बेकायदा नळ जोडण्यांचे सर्वेक्षण करण्यासठी महापालिकेने निविदा काढली आहे. त्यातून अशा जोडण्याची संख्या कळेल. पालिका क्षेत्रात आत्तापर्यंत नळ जोडण्यांवर ७० हजार मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाल. अजून ११ हजार ५०० अधिकृत जोडण्यांवर मीटर बसविण्याचे काम सुरु आहे. इमारतींना मीटरप्रमाणे पाण्याचे बील पाठविले जात होते. येत्या १ एप्रिलपासून चाळीतील मीटर बसविलेल्या नळ जोडण्यांनाही वापरानुसार बिल पाठविणार आहे.