शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आले... पण वीज गेली

By admin | Updated: July 12, 2016 02:36 IST

मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरू आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी केव्हाही वीज गायब होत असल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत.

ठाणे : मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरू आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी केव्हाही वीज गायब होत असल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत. घोडबंदर परिसर, नौपाडा, कोपरी, दिवा, मुंब्रा आदींसह इतर भागांतही विजेचा लहरी कारभार सुरू आहे. वीजपुरवठा खंडित होण्याची अनेक कारणे सांगितली जात असली तरी खरी कारणे काय, याचे उत्तर मात्र महावितरणकडे नाही. घोडबंदर भागातील मानपाडा, शिवाजीनगर, मनोरमानगर, गणेशनगर आदी भागांत दिवसातून १० ते १५ वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. काही भागांत अंडरग्राउंड वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, तर घोडबंदरच्या काही भागांमध्ये आजही ओव्हरहेड वीजपुरवठा सुरू आहे. वीजपुरवठा खंडित होण्यामागे जोरदार पाऊस हेच कारण असल्याचा सूर महावितरण लावत आहे. ओव्हरहेड लाइनच्या ठिकाणी कार्बन पकडणे, कंडक्टर डॅमेज होणे आदींसह इतर ट्रान्सफॉर्मरवरील अतिरिक्त भार यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या ठाणे विभागात रोज १५० च्या आसपास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी येतात.परंतु, एका तक्रारीवर काम करीत असताना पुन्हा दुसरी तक्रार, अशा तक्रारी वाढतच असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी मान्य केले. गेले दोन दिवस डोंबिवली, कल्याणमधील अनेक भागांत दोन-चार तास वीज गायब आहे. विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण आहेत.गेल्याच आठवड्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी महावितरणच्या विविध तक्रारींबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली होती. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. शिंदेंनी कल्याणमध्येही बैठक घेतली होती. त्याचे काय झाले आणि शिवसेना कधीपासून बैठका-चर्चा करायला लागली, असा संतप्त सवालही त्रस्त नागरिकांनी विचारला.... तरीही पाण्याची बोंब आहेचठाणे, कल्याण-डोंबिवलीत बहुतांशी गृहनिर्माण सोसायट्या असून त्यांना पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईचे संकट दूर झाले, तरी वीज नसल्याने सोसायट्यांच्या टाकीत मुबलक पाणी असूनही ते रहिवाशांना देता येत नाही. त्यामुळे अस्मानी संकटातून सुटलेले महावितरणच्या सुलतानी पाणीसंकटाचे बळी ठरले आहेत.