शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रक्रिया प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:30 IST

जागेअभावी १० कोटींचा निधी पडून

उल्हासनगर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत बायोगॅस प्रकल्प आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पासाठी शासनाकडून १० कोटींचा निधी आला. महापालिकेकडे जागा उपलब्ध नसल्याने निधी पडून असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उल्हासनगर महापालिकेसमोर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न उभा ठाकला असतानाच कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने उसाटणे येथे ३० एकर जागेची मागणी शासनाकडे केली आहे. सहा महिन्यांपूर्वी जागा देण्यास राज्य शासनाने तत्त्वत: मान्यता दिली; मात्र ही जागा अद्याप हस्तांतरित झालेली नाही.स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधकाम व पाडकाम प्रकल्पासाठी एक कोटी ४५ लाख, सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी ६५ लाख, बायोगॅस प्रकल्पासाठी तीन कोटी ४९ लाख आणि कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी साडेचार कोटींचा निधी महापालिकेला मिळाला. बायोगॅस आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागेच्या शोधात पालिका असून जागेअभावी १० कोटींच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. कचराप्रक्रिया, बायोगॅस प्रकल्प सुरू झाल्यास डम्पिंगवर जाणारा सुकया आणि ओल्या कचºयात मोठी घट होणार आहे. शिवसेना शहरप्रमुख आणि सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांनी आरोग्य विभागाला प्रकल्प सुरू करण्यासाठी अनेक खुल्या जागेचा पर्याय दिल्याची माहिती दिली. मात्र, पालिकेकडे जागेची मालकी नसल्याने प्रकल्प उभारणी लांबल्याचे केणी यांनी सांगितले.महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित?कचºयावर प्रक्रिया झाल्यास डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, असे मत सभागृह नेते राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले. कॅम्प नं. ३ येथील स्मशानभूमीशेजारील जागा, मलनि:सारण केंद्राजवळील जागा, आयडीआय कंपनीजवळील भूखंड, कॅम्प नं. २ स्मशानभूमीशेजारील जागा, रिजन्सी गृहसंकुलाशेजारील पालिकेला हस्तांतरित झालेला दोन एकरचा भूखंड तसेच विद्युत विभागाचा भूखंड, कॅम्प नं. ५ येथील परिवहनसेवेचा भूखंड या पर्यायी जागा असल्याचे चौधरी म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर