शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

स्वखर्चातून कचराप्रक्रिया प्रकल्प; वास्तुविशारदाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:42 IST

पर्यावरण दिन विशेष : दोन यंत्रे आजपासून होणार सुरू

मुरलीधर भवार कल्याण : पर्यावरणाचा समतोल राखणारी घरे निर्माण करणाऱ्या वास्तुविशारदाने इको-फ्रेण्डली अर्थात ग्रीन सोसायटी तयार केली आहे. त्यांनी या सोसायटीत स्वखर्चातून वापरलेला नारळ, प्लास्टीक, काचा यांसारख्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी पर्यावरणदिनी दोन संयंत्रे सुरू करण्यात येणार असून नारळाच्या कचºयापासून भुसा, काचेवर प्रक्रिया करून रांगोळी, भाजीपाला व तत्सम कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि प्लास्टीकवरील प्रकिया करून ते रस्ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.कल्याण-शीळ रोडलगत असलेल्या मानपाडा येथून संदप गावाकडे जाणाºया रस्त्यालगत पॅरामाउंट पार्क ही ग्रीन सोसायटी आहे.

सोसायटीच्या आवारात झाडे असून जमिनीत पाणी मुरावे यासाठी पेव्हरब्लॉक लावण्यात आलेले नाहीत. तसेच, गॅलेरीमध्ये बाग असून वर्षा जलसंचयन प्रकल्प राबवण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरण प्रकल्पही सोसायटीच्या मालकाचा आहे. वास्तुविशारद दिलीप देशमुख यांनी ग्रीन सोसायटीची संकल्पना राबवली आहे. पर्यावरणपूरक घरे या विषयात त्यांनी वास्तुविशारदाचे शिक्षण घेतले आहे. इगतपुरीनजीक एका आदिवासी गावात एक हजारापेक्षा जास्त झाडे त्यांनी लावली आहेत. तसेच, प्रदूषण होऊ नये म्हणून त्यांनी बॅटरीवर चालणाºया दोन गाड्या घेतल्या आहेत. आता त्यांनी कचºयाच्या विल्हेवाटीकडे लक्ष केंद्रित केले आहे. पर्यावरण संवर्धनाचा त्यांचा छंद ते स्वखर्चातून जोपासत आहेत.

शहरातील नारळपाणी, भाजीपाला विक्रेत्यांकडील कचरा, फेकलेल्या काचेच्या बाटल्या यावर प्रक्रिया करणारे यंत्र त्यांनी खरेदी केले आहे. त्यासाठी महिनाभरापासून त्यांनी विघटनशील आणि पुनर्प्रक्रियायोग्य कचरा गोळा केला आहे. त्यासाठी दोन यंत्रे कार्यान्वित करणार असून त्यासाठी स्वत:च्या खिशातून दहा लाख खर्च करणार आहेत. नारळाच्या कचºयापासून भुसा बनवून त्याचा सरपण म्हणून वापर करता येणार आहे. काचेपासून रांगोळी, तर प्लास्टीकवर प्रक्रिया करून त्याचा रस्तेकामात उपयोग करता येणार आहे. भाजीपाला व ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

सोसायटीच्या एक पिकअप व्हॅनला दुपारी १ ते रात्री दहा वाजता वाहतूक कमी असताना कचरा गोळा करण्याची परवानगी महापालिकेने द्यावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे देशमुख यांनी केली आहे. त्यांच्याकडून प्रक्रिया केंद्राचे यंत्र उद्या पर्यावरण दिनानिमित्त कार्यान्वित केले जाणार आहे.

काय होणार फायदे

  • कचरा डम्पिंग ग्राउंडवर जाण्याचे प्रमाण कमी होईल.
  • कचऱ्याचा डोंगर वाढणार नाही.
  • डम्पिंगच्या दुर्गंधीपासून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून सुटका होईल.
  • मिथेन वायू निर्मिती थांबून पर्यावरण संरक्षण होईल.
  • कचरा वाहतूक गाड्यांची संख्या कमी झाल्यास वाहतूककोंडी होणार नाही.
  • कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर करावा लागणारा खर्च कमी होईल.
  • पर्यावरणाचे संतुलन राहण्यास मदत होईल.