शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वागळे इस्टेट पोलीस करणार २४ बेवारस वाहनांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST

ठाणे : पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेवारसपणे आढळलेल्या दोन मोटारकारसह तब्बल २४ वाहनांचा वागळे इस्टेट पोलिसांकडून जाहीर लिलाव लवकरच केला ...

ठाणे : पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेवारसपणे आढळलेल्या दोन मोटारकारसह तब्बल २४ वाहनांचा वागळे इस्टेट पोलिसांकडून जाहीर लिलाव लवकरच केला जाणार आहे. यामध्ये सात रिक्षा, १३ दुचाकी आणि एका टेम्पोचा समावेश आहे. एका आठवड्यामध्ये संबंधितांनी ही वाहने नेली नाही तर त्यांची लिलावाद्वारे विक्री केली जाणार असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ही २४ बेवारस वाहने उभी आहेत. ती घेऊन जाण्यासाठी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांच्या पथकांनी संबंधितांना फोनद्वारे तसेच वाहनमालकांच्या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट देऊन ती घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. यात सहा वाहनांच्या क्रमांकाची प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कोणतीही नोंद आढळली नाही, तर आरटीओने दिलेल्या यातील १२ वाहनमालकांच्या पत्यावर वारंवार संपर्क साधूनही ते मिळाले नाही किंवा त्यांच्या पत्त्यामध्ये बदल झाल्याचे आढळले. यातील २४ पैकी तीन वाहनमालकांना वारंवार संपर्क साधूनही त्यांनी वाहन नेण्यास कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.

‘विनाकारण बेवारस २४ वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. येत्या आठवडाभरात या बेवारस वाहनांच्या मालकांनी कोणताही प्रतिसाद दिला नाहीतर त्यांचा लिलाव केला जाणार आहे.’

दत्तात्रेय ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे इस्टेट पोलीस ठाणे