शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर मतदाराचे नाव

By admin | Updated: February 19, 2017 04:23 IST

महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी आता कुठेही धावाधाव करण्याची गरज नसून ठाणे महानगरपालिकेने बनवलेल्या

ठाणे : महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी आता कुठेही धावाधाव करण्याची गरज नसून ठाणे महानगरपालिकेने बनवलेल्या ‘ठाणे व्होटर्स सर्च इंजीन’मुळे त्यांना एका क्लिकवर त्यांच्या नावाची माहिती मिळणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज स्पष्ट केले आहे.अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करणारी ठाणे महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. महापालिकेच्या वतीने शनिवारी या सॉफ्टवेअरचे अनावरण करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, उपायुक्त (निवडणूक) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी बऱ्याच वेळा मतदारास आपले नाव मतदारयादीत आहे किंवा नाही, याची कल्पना नसते. अशा वेळी मतदान केंद्रावर गोंधळ उडू नये, यासाठी जयस्वाल यांच्या संकल्पनेतून हे सर्च इंजीन तयार करण्यात आले आहे. कोणत्याही मतदारास http://tmcvotersearch.org या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव मतदारयादीत आहे किंवा नाही, याची माहिती मिळू शकते. या सर्च इंजीनमध्ये मतदाराचे नाव, मतदारसंघाचे नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्र मांक यापैकी काहीही टाइप केले तरी त्याची माहिती तसेच त्याच्या कुटुंबातील इतर मतदार असलेल्या व्यक्तींची माहिती, प्रभाग क्र मांक, मतदान केंद्राचा क्र मांक, त्याचा पत्ता तत्काळ मिळू शकतो. (प्रतिनिधी)श्रीकांत सिंह ठाण्यात मुख्य निवडणूक निरीक्षक- ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या तयारीचा शनिवारी प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीकांत सिंह यांनी आढावा घेतला व निवडणुका सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने चोख जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना दिल्या. - पोलीस आयुक्त परमबीर सिंग, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.