शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद-सहस्रबुद्धे! आंबेडकर-गडकरी!!

By admin | Updated: January 14, 2017 06:18 IST

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी ठाण्यात झाली. त्यानिमित्ताने उभारण्यात आलेल्या सभागृहाला

ठाणे : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी ठाण्यात झाली. त्यानिमित्ताने उभारण्यात आलेल्या सभागृहाला दिवंगत नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे नाव देण्यात आले होते. या ठिकाणी असलेल्या खांबांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या काही जुन्या नेत्यांसोबत तसेच राष्ट्रपुरुषांसोबत भाजपाचे विद्यमान केंद्रीय मंत्री व नेते यांची छायाचित्रे असलेले बॅनर्स लावले होते. अशा जोड्या जुळवलेले बॅनर लावण्यामागे नेमका हेतू काय होता, त्याचा उलगडा झालेला नाही.हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान शिकागोमधील सर्वधर्म परिषदेत प्रभावीपणे मांडणारे स्वामी विवेकानंद यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांचे, तर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावले होते. दीनदयाळ उपाध्याय यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पोस्टर झळकले, तर सध्या विजनवासात गेलेले नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असलेले पोस्टर औचित्यपूर्ण होते, तर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एका पोस्टरवर दाखवण्यात आले होते.प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलेले अन्य पदाधिकारी ज्या सभागृहात बसले होते, तेथेच हे बॅनर्स लावण्यात आले होते आणि त्यावरील ‘जोड्या’ पाहून तेही स्तिमित झाले होते. यासोबत उपाध्याय, मुखर्जी, वाजपेयी, अडवाणी यांची गाजलेली वचने उद््धृत केली होती. पक्षाचा इतिहास आणि वर्तमान यांचा तौलनिक आढावाही मांडण्यात आला होता. (प्रतिनिधी)