शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वाडा येथे श्रमजीवीचा विराट मोर्चा

By admin | Updated: December 22, 2015 00:14 IST

महागाई, कुपोषण व ‘त्या’ आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज वाडा तहसिलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले.

वाडा : महागाई, कुपोषण व ‘त्या’ आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज वाडा तहसिलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले.या मोचार्चे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, सहसरचिटणीस विजय जाधव यांनी केले.कहा गये अच्छे दिन ; वापस लाओ पुराने दिन, मंत्री खातो तुपाशी ; आदिवासी मुलं उपाशी, पोषण आहार मिळालाच पाहिजे ; मिळालाच पाहिजे, भाजपच्या गुंडांना अटक करा; अटक करा, सवरा मंत्री कोणाचा ; दलालांचा ठेकेदारांचा, खाली करा खाली करा; सवरा खुर्ची खाली करा अशा घोषणा मोर्चा दरम्यान देण्यात आल्या.देसई नाका येथून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत फिरून तिचे रुपांतर तहसिलदार कार्यालयासमोर मोर्चात झाले. यावेळी मोर्चात कांदा, लसूण व सकस आहार योजने अंतर्गत भरलेले जेवणाचे ताट प्रतिकात्मक स्वरूपात तहसिलदारांना देण्यात आले. २५ रूपयांत सकस आहार देणे शक्य नसताना अशी फसवी योजना कार्यान्वित करणाऱ्या सरकारचा यावेळी निषेध केला. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, ४ डिसेंबर २०१५ रोजी उद्घाटन केलेली अमृत आहार योजना प्रत्यक्षात कार्यान्वित झालेली नसून आजपर्यंत एकाही तालुक्यात निधी उपलब्ध झाला नसून योजना फक्त कागदावर आहे. या योजनेमुळे आधीच कुपोषित म्हणून जन्मलेल्या मुलांचे कुपोषण कसे दूर होणार याबाबत स्पष्टीकरण द्यावे. व्ही. सी. डी. सी. बंद करून सरकारने त्याला पर्यायी योजना दिलेली नाही. आणि अमृत आहार योजना हा त्याचा पर्याय नाही म्हणूनच कुपोषित मुलांच्या विशेष आहारासाठी व्ही. सी. डी सी. योजना पुन्हा सुरू करावी या मागण्या होत्या. या मोचार्ला श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी बाळाराम भोईर, केशव नानकर, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, सरिता जाधव, लक्ष्मण पडवले, जया पारधी, दशरथ बालके, भगवान मते, आदींनी भाषणात सवरा यांच्या वर टीका केली.