शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे पुलाला पुन्हा तडे; पुढील आठवडयात दुरुस्तीला सुरुवात

By admin | Updated: September 29, 2016 22:53 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील वरसावे पुलाच्या गर्डरला पुन्हा तडे गेल्याचे नुकत्याच पूर्ण झालेल्या स्ट्रक्टरल ऑडीटमुळे निदर्शनास आले आहे

राजू काळे भाईंदर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील वरसावे पुलाच्या गर्डरला पुन्हा तडे गेल्याचे नुकत्याच पूर्ण झालेल्या स्ट्रक्टरल ऑडीटमुळे निदर्शनास आले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी हा पुल पुढील आठवडयात वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. सध्या या पुलावरून पुढील धोका टाळण्यासाठी केवळ हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. तर बाजूच्या पुलावरून अवजड वाहने प्रत्येकी 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने सोडली जात आहेत. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून तिच्या नियोजनासाठी पालघर व ठाणे ग्रामीण वाहतूक व स्थानिक पोलीस कर्मचारी, अधिकारी 24 तास तैनात करण्यात आले आहेत. गेल्या 33 वर्षांत पुलाची तिसऱ्यांदा दुरुस्ती करण्यात येत आहे. 2013 मध्ये देखील पुलाच्या गर्डरला तडा गेल्याने तब्बल दिड वर्षे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन वाहनांना त्यातून बाहेर पाडण्यासाठी तब्बल 2 ते 3 तासांचा विलंब लागत होता. यानंतर पुलाच्या दुरुस्तीचा मुद्दा ऑगस्टमध्ये महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमुळे उपस्थितीत झाला. त्याचे वृत्त प्रथम लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर 3 सेप्टेंबरला भारतीय राष्ट्रीय महामार्गीय प्राधिकरणाने (एनएचएआय) आंतरराष्ट्रीय दर्जाचे बांधकाम तज्ञ डॉ. रैना यांच्या नेतृत्वाखालील पथकामार्फत पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात केली. ती 22 सप्टेंबरला पूर्ण करण्यात आली.

तपासणी दरम्यान पुलाच्या वरसावे बाजूकडील चौथ्या क्रमांकाच्या 114 मीटर लांबीच्या गर्डरला एकूण तीन तडे गेल्याचे आढळून आले. यात एक तडा मोठा असून उर्वरित लहान स्वरूपाचे तडे आहेत. सध्या त्याची दुरुस्ती कशा प्रकारे करायची त्याची आखणी पथकाद्वारे केली जात आहे. त्यांच्याकडून पद्धतशीर दुरुस्तीचे निर्देश आल्यानंतर दुरुस्तीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचा अंतिम अहवाल या आठवड्यात एनएचएआयला प्राप्त होणार असून पुढील आठवड्यात त्याच्या दुरुस्तीला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. त्यावेळी मात्र पुलावर सध्या सुरु असलेली हलक्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या दुरुस्तीला किमान 15 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता एनएचएआयकडून वर्तविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी मोठा विलंब लागण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

पुलाच्या दुरुस्तीदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक पार पडली. त्यात महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील दापचारी, नाशिकरोड, वाडा-भिवंडी रोड आदी ठिकाणी अवजड वाहने टप्या-टप्याने गुजरात व मुंबईच्या दिशेने सोडण्यासाठी वाहनतळ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे वाहतूक कोंडीचे काही प्रमाणात नियोजन होऊन त्याचा ताण सुसह्य होणार आहे. यावर पालकमंत्र्यांकडून थेट नियंत्रण ठेवले जात असून दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एनएचएआयकडून सांगण्यात आले आहे.