शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

वसई, विरार-पालघर, डहाणू प्रवाशांत संघर्ष?

By admin | Updated: October 14, 2016 06:06 IST

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट विरार दरम्यान मुबलक लोकल ट्रेन सेवा असताना मुंबई सेंट्रल वरून गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याचा ट्रेन मधून

पालघर : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट विरार दरम्यान मुबलक लोकल ट्रेन सेवा असताना मुंबई सेंट्रल वरून गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याचा ट्रेन मधून प्रवास करीत पालघर-डहाणूच्या दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दमदाटी करणाऱ्या विरारच्या प्रवाशां विरोधात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या विरोधात सोशल मिडियावरील रेल रोकोच्या मेसेजला मोठा पाठिंबा मिळत आहे.पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील विरार ते डहाणू दरम्यानच्या भागाला सन १९९९ मध्ये उपनगरीय क्षेत्र म्हणून रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.परंतु या घोषणेनंतर रेल्वे सेवा सुरु होण्याच्या हालचालींना वेग येईल ही इथल्या प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे इथल्या प्रवासी संघटनेने वेळोवेळी रेल्वे प्रशासनास निवेदनाद्वारे मागण्या केल्या. मात्र त्या पत्रव्यवहाराचा कुठलाही परिणाम न झाल्याने शेवटी स्थानिक प्रवाशांना पालघर-डहाणू ते विरार ते पुढे चर्चगेट असा प्रवास अनेक वर्षे उभ्याने, कोंदटलेल्या वातावरणात करण्याची पाळी ओढवली. प्रवासी संघटना आणि प्रवासी यांनी अनेक वेळा रेल रोको आंदोलने करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी प्रसिद्धी माध्यमांनी प्रवाशांच्या समस्याही मांडल्या. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनी १६ एप्रिल २०१६ रोजी उपनगरीय लोकल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली.लोकल वाहतूक सुरु करण्यात आल्याने आपली अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने आता सुखासमाधानाने प्रवास करता येईल ह्या स्थानिकांच्या अपेक्षेला रेल्वे प्रशासनाने धक्का देत मोजक्याच आणि अपुऱ्या लोकल सेवा दिल्या. त्यामुळे नाईलाजाने पालघर, डहाणू, बोईसर, सफाळे इ. भागातील प्रवाशांना पुन्हा मेल, एक्सप्रेस वर अवलंबून रहावे लागले.परंतु मुंबई सेंट्रल वरून सुटणाऱ्या वलसाड एक्स्प्रेस, सौराष्ट्र मेल, लोकशक्ती एक्स्प्रेस ह्या रात्री सुटणाऱ्या गाड्याना विरार स्टेशनला थांबा देण्यात आल्याचा फायदा उचलीत विरारच्या प्रवाशांनी सफाळेपर्यंत रेल्वे पास काढून विरार पर्यंत प्रवास करण्याची क्लृप्ती शोधून काढली. चर्चगेट ते विरार दरम्यान दर पंधरा मिनिटांनी एक लोकल गाडी असतानाही मोठ्या संख्येने विरार चे प्रवासी या एक्स्प्रेस मध्ये चढू लागल्याचा फटका पालघर, डहाणू तील प्रवाशांना बसून रेल्वे पोलीस, टीसी यांनी त्रास द्यायला सुरु वात केली. विरारच्या प्रवाशांसाठी दर पंधरा मिनिटांनी लोकल सेवा असताना त्यांनी लांब पल्याच्या ट्रेन मधून प्रवास करणेच चुकीचे असल्याच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार केल्या गेल्यात परंतु त्यांची कोणतीही दखल रेल्वेने घेतली नाही. त्यामुळे आता उग्र आंदोलन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. (वार्ताहर)