शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यालयाची तोडफोड, शिवसैनिकांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST

कल्याण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसैनिकांनी भाजपचे शहर ...

कल्याण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसैनिकांनी भाजपचे शहर कार्यालय तोडल्याच्या निषेधार्थ संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाणे ते शिवाजी चौकापर्यंत मोर्चा काढला. तसेच तेथे ठिय्या दिला. तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपने पोलिसांना दिला आहे.

शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी, आ. विश्वनाथ भोईर व शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी भाजप कार्यकर्ते प्रसाद टुमकर यांनाही मारहाण करण्यात आली. त्यामुळे भाजपचे संतप्त कार्यकर्ते बाजारपेठ पोलीस ठाण्यात जमा झाले. भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेविका वैशाली पाटील, महिला आघाडीच्या प्रिया शर्मा, आदींनी टुमकर यांच्या मारहाणप्रकरणी भोईर, साळवी यांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांच्या उपस्थितीत शिवसैनिक मारहाण करतात, तेव्हा पोलीस काय झोपले होते का, असा सवालही त्यांनी केला.

यावेळी पोलिसांनी त्यांची मागणी ऐकून घेत टुमकर यांना वैद्यकीय तपासणीस नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, टुमकर यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ॲक्शनचा जबाब रिॲक्शनने देण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून पारनाका परिसरातून मोर्चा काढला. भाजप कार्यकर्त्यांचा टिळकनगर शिवसेना शाखेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र, मोर्चा पारनाक्याहून शिवाजी चौकाच्या दिशेने गेला. तेव्हा शिवाजी चौकातील शिवसेना शाखा तोडण्याची कुजबुज भाजप कार्यकर्त्यांमध्ये असल्याने पोलिसांनी शिवाजी चौकात मोर्चा अडविला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात ठिय्या धरला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

-------------

शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर केलेला हल्ला हा भ्याड हल्ला आहे. आधी आवाज द्या, मग हल्ला करा, तेव्हा भाजप कार्यकर्त्यांची काय ताकद हे कळेल. आता भाजप कार्यकर्ते शांत दिसत असले तरी उद्या काय होईल याची जबाबदारी पोलिसांची असेल. तेव्हा भाजपने कायदा हाती घेतला असे बोलू नका. आधी हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करा.

- प्रेमनाथ म्हात्रे, भाजप, कल्याण शहराध्यक्ष

----------