शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वसईच्या बबलीने उकळले बँक अधिकाऱ्याकडून ४७ लाख

By admin | Updated: January 11, 2016 01:48 IST

बड्या बँकेतील उच्च अधिकाऱ्याशी सलगी प्रस्थापित करून नवऱ्याच्या मदतीने त्याच्याकडून ४७ लाख रुपये उकळणाऱ्या वसईच्या शिल्पा जाधवला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे

वसई : बड्या बँकेतील उच्च अधिकाऱ्याशी सलगी प्रस्थापित करून नवऱ्याच्या मदतीने त्याच्याकडून ४७ लाख रुपये उकळणाऱ्या वसईच्या शिल्पा जाधवला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात तिला साथ देणाऱ्या तिचा पती विकास गुप्ता उर्फ जावेद यालाही त्यांनी गजाआड केले आहे. पैसेवाल्या व्यक्तींना हेरायचे त्यांच्याशी काहीतरी कारण काढून ओळख निर्माण करायची त्यातून शारीरिक जवळीक साधायची व नंतर तिची छायाचित्रे काढून चित्रण करून त्याआधारे अथवा तुमच्यापासून मी गरोदर राहिले, अशी बतावणी करून तिला ब्लॅकमेल करून खंडणी उकळायची असा या दुकलीचा गोरखधंदा होता. त्यात तिचा पतीही तिला साथ देत होता. पंजाब नॅशनल बँकेतील एक उच्च अधिकारी गत फेब्रुवारीत फर्स्टक्लासमधून लोकलने प्रवास करीत होते. त्याला हेरून शिल्पा त्यांच्या समोरच्या आसनावर जाऊन बसली. माझ्या मोबाईलचे चार्जिंग संपले मला पतीला एक एसएमएस करायचा आहे त्यासाठी तुमचा मोबाईल द्या, म्हणून तिने विनंती केली. त्याने तो दिल्यावर त्यावरून तिने नवऱ्याला एसएमएस केला. त्याचा फोन नंबर माहित झाल्यावर त्याच्याशी काही ना काही कारण काढून सतत संपर्क साधला. मग त्याच्या शाखेत जाऊन खातेही उघडले. त्यामुळे भेटीही घडवून आणल्या जाऊ लागल्या. नंतर तिने त्याला एका हॉटेलमध्ये बोलावले. थोडी मौजमजा करीत असताना शिल्पाच्या नवऱ्याने त्यांचे फोटो काढले.या अधिकाऱ्याला एकटे गाठून तुम्ही माझ्या पत्नीशी अफेअर करीत आहात, असे म्हणून त्याला ते फोटो दाखविले. मी शिल्पाचा नवरा आहे. माझे नाव जावेद आहे. असे सांगून ५० हजार रुपये द्या नाहीतर मी हे फोटो जगजाहीर करीन अशी धमकी देऊन ती रक्कम उकळली.च्या पैशाचा वापर करून हे जोडपे अलिशान गाड्या, दागिने, चैनीच्या वस्तू घेत होते. यातला अनेक मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांना मरीन लाईन्स येथे खंडणीविरोधी पथकाने अटक केली. च्जावेदने या अधिकाऱ्याला एकदा मारहाण देखील केल्याचे समजते. या जोडप्याने अशाच रितीने आणखी काही जणांना जाळ्यात पकडून ब्लॅकमेल केले आहे काय? याचा तपास आता पोलीस करीत आहेत.