शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ पालिकेच्या लसीकरणाचे टोकन दलालांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने लसीकरण करण्यासाठी सकाळी सात वाजता नागरिकांना टोकनचे वाटप केले जाते. मात्र, टोकनच्या एकूण संख्यापैकी ...

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने लसीकरण करण्यासाठी सकाळी सात वाजता नागरिकांना टोकनचे वाटप केले जाते. मात्र, टोकनच्या एकूण संख्यापैकी अनेक टोकन पालिकेतील कर्मचारी आणि त्यांच्याशी संलग्न असलेले दलाल परस्पर लाटत आहे. त्यामुळे रात्रभर रांगेत उभ्या राहिलेल्या नागरिकांच्या हाती निराशा येत आहे.

पालिकेच्या वतीने लसीकरणासाठी देण्यात येणारे टाेकन मिळविण्यासाठी नागरिकांवर रस्त्यावर झाेपण्याची वेळ येते. मात्र, टाेकन वाटपात पारदर्शकता नाही. पालिका अधिकाऱ्यांच्या निगराणीत हे टोेकन वाटप होत असले तरी पालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचारी हे काही टोकन स्वतःसाठी राखून ठेवत आहेत. काही कर्मचारी दलालांना हाताशी धरून हे टोकन ३०० ते ५०० रुपयांत विकले जात असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. एकूण टोकनपैकी केवळ निम्मेच टोकन रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना मिळत आहेत. टोकन मिळाल्यानंतर लस मिळणार ही बाब उघड झाल्याने आता काही दलाल रात्रभर रांगेत उभे राहून टोकन मिळाल्यावर त्याची परस्पर विक्री करण्याचे काम करीत आहेत.

रांगेत उभे राहणारे दलाल आणि पालिकेचे काही कर्मचारी यांनी तयार केलेले दलाल यांच्या विळख्यात नगरपालिकेची लसीकरण मोहीम सापडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लस मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रांगेत उभ्या असलेल्या अनेक नागरिकांपैकी काही नागरिक हे दररोज रांगेत उभे राहिलेले दिसत आहेत. नियमित रांगेत दिसणारे व्यक्ती हे टोकनची विक्री करीत असल्याची बाब उघड झाली आहे.

----------

रांगेत आठवा क्रमांक, टाेकन मिळाला १६८ नंबरचा

* अंबरनाथ नगरपालिकेत टोकन वाटप होणार असल्याने रात्री दहा वाजल्यापासून काही नागरिक रांगेत उभे राहत आहेत. त्यात महिलांचाही समावेश आहे. रात्रभर या महिलांना टोकनसाठी रस्त्यावर झोपावे लागत आहे. एवढे केल्यानंतरही सकाळी टोकन मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही.

* बुधवारी पहाटे रांगेत उभ्या असलेल्या एका नागरिकाचा आठवा नंबर असतानाही त्याच्या वाट्याला १६८ नंबरचा टोकन आला. यावरून उघड झाले आहे की दीडशेहून अधिक टोकन हे परस्पर इतरांना वाटले जात आहे. रांगेतील आठव्या क्रमांकाच्या व्यक्तीला किमान बारा ते पंधरा क्रमांकाचा टोकन मिळणे अपेक्षित होते. त्यांना १५० च्या पुढचे आकडे मिळाल्याने या टोकन वाटपमध्ये घोळ असल्याची बाब स्पष्ट हाेत आहे.

* टोकनसाठी ज्या व्यक्ती रांगेत उभे राहू शकत नाहीत. ते लोक काही दलालांना ३०० ते ५०० रुपये देऊन रांगेत उभे करीत आहेत आणि त्यानंतर टोकन मिळाल्यावर त्या टोकनचा वापर करून लस घेत आहेत. टोकन मिळविण्यासाठीही दलालांची टोळी निर्माण झाली आहे. दररोज दिसणाऱ्या या दलालांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.