शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वाहने जळीत कांडाचा तपास लावणा-या नौपाडा पोलिसांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 23:00 IST

तीन अल्पववयीन मुलींच्या अहपहरणाचा यशस्वी तपास करणा-या नौपाडा पोलिसांचा पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी विशेष सत्कार केला

ठाणे, दि. 26 - सिद्धेश्वर तलाव परिसरातील सहा वाहनांना आगी लावणा-या आणि तीन अल्पववयीन मुलींच्या अहपहरणाचा यशस्वी तपास करणा-या नौपाडा पोलिसांचा पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी विशेष सत्कार केला. बुधवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत प्रमाणपत्र देऊन या अधिका-यांचा विशेष सन्मान केला.खोपट, सिद्धेश्वर तलाव परिसरातील शिवसेना उपविभाग विनोद पाटेकर आणि एका महिलेच्या रिक्षासह सहा वाहनांची १६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास जाळपोळ करणा-या रोहन सावंत (२०), हिमांशू उर्फ टिनू सावंत (२०) आणि ओंकार भोसले यांना नौपाडा पोलिसांनी अवघ्या १८ तासांमध्ये अटक केली. या प्रकरणाचा छडा लावणारे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक विशाल बनकर, हवालदार सचिन खरटमोल, आर. एन. भोई आणि आर. एम. शेकडे यांचा बुधवारी पोलीस आयुक्तांनी विशेष सत्कार केला.तर १७ जुलै रोजी सिद्धेश्वर तलाव परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या तीन पैकी दोन मुलींचा शोध घेऊन तिघांना २४ तासांच्या आतच बेडया ठोकणा-या उपनिरीक्षक शिरीष यादव, प्रशांत लोंढे, हवालदार सुनिल अहिरे, शब्बीर फरास यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.दरम्यान, नौपाडयातील एका खासगी वित्त कंपनीवर दरोडयासाठी आलेल्या झारखंडच्या १५ जणांच्या टोळीला जेरबंद करणारे गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांचाही यावेळी पोलीस आयुक्तांनी विशेष सन्मान केला.