शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात निवडणुकांची लगबग सुरू

By admin | Updated: June 20, 2017 05:37 IST

मुंबईसह राज्यातील विद्यापीठांमध्ये सध्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विद्यापीठ कायदा पारित झाल्यानंतर विद्यापीठात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्यातील विद्यापीठांमध्ये सध्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विद्यापीठ कायदा पारित झाल्यानंतर विद्यापीठात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा असलेल्या पदवीधरांच्या नावनोंदणीच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. यंदा मुंबई विद्यापीठाने ही नावनोंदणी आॅनलाइन पद्धतीने सुरू केली असली तरी अनेक जण यावर नाराज आहेत.विद्यापीठात २३ वर्षांनी निवडणुका होत आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्या आहेत. पदवीधरांना या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा हक्क असतो. पण, त्याआधी नावनोंदणी असणे आवश्यक असते. ३० जूनपर्यंत नावनोंदणी झालेल्या व्यक्तींनाच मतदानाचा हक्क मिळणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातून पदवीधर झालेल्यांचा शोध घेऊन नावनोंदणीला वेग प्राप्त झाला आहे. आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हरचा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना पदवीधरांकडून अर्ज भरून घेत आहेत. सोशल मीडियावरून निवडणुकांविषयी जनजागृती केली जात आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेश मंत्री प्रमोद कऱ्हाडे यांनी सांगितले की, विद्यापीठ निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास दिरंगाई करत आहे. ठरावीक अधिकारी ही प्रक्रिया पाहात आहेत. पण, आता लवकरच निवडणुका होण्याची गरज आहे. माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी सांगितले, ३० जूनपर्यंत पदवीधरांची नावनोंदणी करणे तसे अवघड आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. पण, आॅगस्ट महिन्यात सिनेट बसवायची असल्यामुळे नावनोंदणीची मुदतवाढ मिळणार नाही. सध्या अन्य प्रवेशांची प्रक्रिया सुरू आहे, त्यात पालक, विद्यार्थी व्यस्त आहेत. पण, मुदतवाढ मिळणार नसल्याने आता अडचणींवर मात करून प्रक्रिया सुरू आहे.