शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

विनाहेल्मेट १८८९ दुचाकीस्वारांनी भरला नऊ लाख ३४ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST

ठाणे : कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रेल्वे सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे. अशा वेळी रस्त्यांवरील ...

ठाणे : कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रेल्वे सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे. अशा वेळी रस्त्यांवरील अपघातांमध्ये मृत्यूंचे प्रमाण वाढल्यामुळे ठाणे शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन दिवसांत हेल्मेटचा वापर न करताच मोटारसायकल चालविणाऱ्या १ हजार ८८९ चालकांकडून नऊ लाख ३४ हजारांचा, तर सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या मोटारकार चालकांकडून १ लाख ६८ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मार्च २०२१ पासून सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये उपनगरी रेल्वेसेवा ही केवळ अत्यावश्यक सेवांसाठी सुरू ठेवली आहे. त्यामुळे खासगी कामासाठी किंवा नोकरीसाठी मुंबईतून ठाणे परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना रेल्वेत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे अनेक जण मिळेल त्या वाहनाने मुंबईतून ये- जा करीत आहेत. त्यामुळेच सध्या ठाणे ते मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गर्दी वाढल्यामुळे वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. वाढत्या वाहनसंखेमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून यामध्ये ७० टक्के अपघात हे मोटारसायकल (बाइक) स्वारांचे होत आहेत. त्यातही मृत्यूचे प्रमाण ८० टक्के आहे. हे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच मोटारकार वाहनांच्या अपघातामध्येही सीटबेल्टचा वापर न केल्याने सुरक्षेसाठी असलेल्या वाहनांमधील एअरबॅग न उघडल्याने गंभीर किंवा प्राणांतिक अपघात झाले आहेत.

अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी विनाहेल्मेट दुचाकी चालणाऱ्या तसेच मोटारकारमध्ये सीटबेल्ट न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. यानुसार १८, १९ आणि २१ जून या तीन दिवसांच्या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविली. आयुक्तालयातील १८ वाहतूक उपविभागामार्फत १ हजार ८८९ दुचाकी चालकांवर कारवाई करून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ९ लाख ३४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. तर सीटबेल्ट न लावताच वाहन चालविणाऱ्या ८४३ चालकांकडून १ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. या मोहिमेमध्ये एकूण ११ लाख ३ हजारांचा दंड वसूल केला.