शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

उल्हासनगरची भुयारी गटार योजना मार्गी

By admin | Updated: March 27, 2016 02:21 IST

महापालिकेच्या ४०० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात २३३ कोटींचा निधीही सरकारने देऊ केला आहे. या योजनेचा

- सदानंद नाईक,  उल्हासनगर महापालिकेच्या ४०० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात २३३ कोटींचा निधीही सरकारने देऊ केला आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे. मान्यता मिळताच निविदा काढून योजनेला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. शहरात १९८४ ते १९९३ दरम्यान महाराष्ट्र पाणीपुरवठा मलनि:सारण योजनेंतर्गत पालिकेने भुयारी गटार योजना राबवली. १९९३ मध्ये तीन लाख ६० हजार इतकी लोकसंख्या गृहीत धरून २८ दशलक्ष लीटर क्षमतेची भुयार गटार योजना राबवली. आता लोकसंख्या आठ ते नऊ लाखांच्या घरात गेली आहे. ती पुढील दहा वर्षांत आणखी वाढेल.परिणामी, सध्याच्या गटारांची क्षमता संपली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गटारातील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसते. गटारांच्या दुरुस्तीवर पालिकेने दोन कोटी रुपये खर्च केले. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही.त्यामुळे महापालिकेने नवीन भुयारी गटार योजना आखली. महापालिकेने सुरुवातीला २५४ कोटींची योजना केंद्र सरकारकडे पाठवली. २०२१ मधील १२ लाख लोकसंख्या गृहीत धरून १३५ दक्षलक्ष लीटर क्षमतेची योजना तयार केली आहे. त्यात नव्याने सुधारणा केल्याने २५४ कोटींची योजना आता ४०० कोटींवर गेली आहे. त्यासाठी २३३ कोटी रुपयांच्या निधीला महाराष्ट्र सुकाणू समितीने मंजुरी दिली आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवामहापालिका पाणीपुरवठा विभागांतर्गत भुयारी गटार विभाग येतो. या विभागातर्फे गटारांची निगा व दुरुस्ती केली जाते. या विभागाकडे साफसफाईसाठी प्रशिक्षित कर्मचारी व अत्याधुनिक यंत्रसामग्री नाही. त्यामुळे त्यांना खाजगी कंत्राटदारावर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच खडेगोळवली येथील बंद पडलेल्या मलनि:सारण केंद्रावर कोट्यवधींचा खर्च होत आहे. या प्रकारच्या चौकशीची मागणी वारंवार झाली आहे. मात्र, पालिकेने कोणतीच कार्यवाही केलेली नाही.सांडपाणी थेट वालधुनी नदीतमहापालिकेचे २८ दशलक्ष लीटर क्षमतेचे खडेगोळवली येथील मलनि:सारण केंद्र नावालाच सुरू आहे. शहरातील दशलक्ष लीटर सांडपाणी प्रक्रिया न करता थेट वालधुनी नदीत सोडले जात आहे. शहरातील सांडपाण्यासह जीन्स कारखाने व अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखाने विषारी सांडपाणी सोडत असल्याने वालधुनी नदी प्रदूषित झाली आहे.