शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

मर्यादावेल समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: September 25, 2015 02:05 IST

विसर्जनानंतर साचलेले निर्माल्य, प्लास्टीक व पॉलिथीनचा वाढता कचरा आणि अवैध रेती उत्खनन आदी मुळे समुद्रकिनारी नैसर्गिकरित्या धूप नियंत्रणात

बोर्डी : विसर्जनानंतर साचलेले निर्माल्य, प्लास्टीक व पॉलिथीनचा वाढता कचरा आणि अवैध रेती उत्खनन आदी मुळे समुद्रकिनारी नैसर्गिकरित्या धूप नियंत्रणात महत्वपूर्ण योगदान देणारी मर्यादावेल समस्येच्या विळखात सापडली आहे. तत्काळ उपाय न योजल्यास हा अमूल्य ठेवा नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.डहाणू तालुक्यातील बोर्डी, घोलवड, नरपड, चिखले तसेच झाई या गावांना समुद्रकिनाऱ्याचा वरदहस्त लाभला आहे. गेल्या दशकापासून भरतीच्या तडाख्यांनी किनाऱ्याची प्रचंड धूप होत असून किनारा मागे येऊ लागल्याने घरांना धोका उद्भवत आहे. प्रतिवषी सुरू बागेतील वृक्षांची रांग उन्मळून जमीनदोस्त होत आहे. तिवरांची झाडे आणि मर्यादावेल नैसर्गिक धूप नियंत्रणाचे कार्य करतात. पावसाळ्यात तिवरांची बीज अंकुरून रोपटी तयार होतात. पेराद्वारे वाढून वाळुवर फोफावणाऱ्या मर्यादावेलीची घनदाट हिरवी जाळी अल्पावधीत पसरते. त्यामुळे माती घट्ट होऊन दुर्वांसारख्या अन्य गवताची वाढ होते. सोसाट्याच्या वाऱ्यातही धूप नियंत्रीत होते. त्यांची आपट्याच्या आकारातील गर्द हिरवी पाने आणि धोतऱ्याच्या फुलांच्या आकारातील फिकट जांभळ्या रंगातील फुलांनी सौदर्यात भर टाकतात शिवाय जैवविविधता टिकविण्याचे मोलाचे कार्य साधले जाते. दात व पोट दुखीवर तिच्या पानांचा औषधी वापर केला जातो. शेतकरीवर्ग खळ्याच्या रिती करीता तसेच बारसे, लग्नकार्य, अंत्यविधी इ. धार्मिक कार्यात तिला अनन्यसाधारण महत्व आहे.दरम्यान कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यासह प्लास्टीक व पॉलिथीन समुद्रात सोडले जाते. अविवेकी नागरीक तसेच काही ग्रामपंचायतींकडून किनाऱ्यावर कचरा टाकला जातो. गणेश विसर्जनानंतर साचलेल्या निर्माल्याची भर त्यात पडली आहे. अवैध रेती उत्खनन करून सिमेंट पोत्यात भरून रचून ठेवली जाते. रात्रीच्या वेळी रेतीची वाहतूक करणारी वाहने थेट समुद्रात उतरविली जातात. त्यामुळे मर्यादावेलीची अतोनात हानी होत आहे. रेती उत्खननास पूर्णपणे आळा न बसल्यास समुद्रकिनारा भकास बनेल. त्याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर होऊन रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर येईल. या करीता जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी पर्यावरणपे्रमींकडून केली जात आहे. (वार्ताहर)