शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावरच

By admin | Updated: May 23, 2017 01:22 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्यादृष्टीने शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले आहे. तरीदेखील निम्याहून अधिक नागरिकांनी अद्याप कचरा

लोकमत न्यूज नेटवर्क भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्यादृष्टीने शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले आहे. तरीदेखील निम्याहून अधिक नागरिकांनी अद्याप कचरा वर्गीकरणाला सुरूवात केली नसल्याने त्यांचा कचराच न उचलण्याचे फर्मान पालिकेने जारी केले आहे. यामुळे वर्गीकरण न करणाऱ्यांचा कचरा दोन दिवसांपासून रस्त्यावर पसरू लागला आहे. केंद्र सरकारने जानेवारी २०१७ मध्ये स्वच्छतेचे सर्र्वेक्षण केल्यानंतर त्यात मीरा-भार्इंदरमधील कचरा वर्गीकरणावर ठपका ठेवण्यात आला. यामुळे स्वच्छतेतील अव्वल क्रमांकातून शहर बाहेर फेकले गेल्याने प्रशासन नाराज झाले आहे. कचऱ्यानेच शहराचा घात केल्याचा रोष प्रशासनाने वर्गीकरणाच्या माध्यमातून थेट नागरिकांवर व्यक्त केला. यात पुरेशी जनजागृती महत्वाची ठरत असली तरी नागरिकांनीही त्याची सवय अंगवळणी पडावी, असा पारदर्शक उद्देश प्रशासनाचा आहे. पालिकेने त्यासाठी उत्तन येथील घनकचरा प्रकल्पात वर्गीकरणाची सोय खाजगी कंत्राटदाराला उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्याची प्रक्रिया जून, जुलैमध्ये सुरू होणार आहे. तत्पूर्वी नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून स्वच्छतेला सुरूवात करावी, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यानुसार प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच नागरिकांना विविध माध्यमांद्वारे कचरा वर्गीकरणाला सुरूवात करण्याचे आवाहन केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु, अनेकांना त्याची पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी अद्यापही कचऱ्याचे वर्गीकरण न करता तो एकत्रित साठविण्याची सवय कायम ठेवली आहे. यामुळे काही गृहनिर्माण संस्थांमध्ये खाजगी सफाई कामगारांकडून उचलण्यात येणारा कचरा वर्गीकरणाअभावी दोन दिवसांपासून तसाच ठेवला आहे. याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्या. तक्ररींवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर सफाई कामागारांकडूनच दोन दिवसानंतर कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृतीला सुरूवात झाल्याचे काही संस्थांतील रहिवाशांकडून सांगितले जात आहे. परंतु अद्याप तरी त्याचा प्रत्यय आलेला दिसून येत नाही. अशी विचित्र अवस्था आहे.