शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उल्हासनगर शहर झाले हगणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:39 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत समितीने शहराला हगणदारी मुक्त म्हणून जाहीर केले. राज्यस्तरीय समितीने पहिल्या फेरीत नापास झाल्यावर शहर दुसºया फेरीत हगणदारीमुक्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत समितीने शहराला हगणदारी मुक्त म्हणून जाहीर केले. राज्यस्तरीय समितीने पहिल्या फेरीत नापास झाल्यावर शहर दुसºया फेरीत हगणदारीमुक्त झाले. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, मनिष हिवरे, अलका पवार यांच्यासह स्वच्छता निरीक्षक, मुकादम व कर्मचारी यांना याचे श्रेय जाते.राज्यस्तरीय समितीने सहा महिन्यांपूर्वी शहराची पाहणी केली होती. त्यावेळी सार्वजनिक स्वच्छतागृहासह अन्य बाबींवर समितीने ताशेरे ओढून सुधारणा करण्याचे सुचवले होते. महापालिकेला हगणदारीमुक्त करण्यासाठी आयुक्त निंबाळकर यांनी स्वत: गुडमॉर्निंग टीमसह सकाळी सहा वाजता डम्पिंग ग्राउंडसह झोपडपटीच्या परिसराचा दौरा केला. प्रातर्विधीसाठी उघडयावर जाणाºया नागरिकांना समजावत गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. महापालिकेसह एमएमआरडीएच्या एकूण ५५० सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती करून त्यांना पाणी व वीजपुरवठा सुरू केला. २ हजार ४६१ वैयक्तिक स्वच्छतागृह गरजूंना बांधून दिली. १० सामूहिक स्वच्छतागृह नव्याने बांधून ३ फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली.स्वच्छ महाराष्ट्र अभियान समितीच्या अहवालात नापास झालेल्या शहराला पास करण्यासाठी आयुक्तांनी उल्हासनगर स्वच्छ व सुंदरचा नारा दिला. त्यांनी गेल्या सहा महिन्यात विविध उपक्रम राबवले. प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक, मुकादम व कर्मचाºयांचे पथक आयुक्तांनी स्थापन करून जनजागृतीवर भर दिला.शहर हगणदारी मुक्त करण्यासाठी आयुक्तांसह उपायुक्त संतोष देहरकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार यांच्यासह सहायक आयुक्त गणेश शिंपी, मनीष हिवरे, अलका पवार, स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांनी प्रयत्न केले.राज्यस्तरीय समितीमध्ये विरार-वसई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त हेरवाडे, ठाणे महापालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, राहुल खंडारे, दयानंद जाधव व किशोर पाटील यांचा समावेश होता. पथकाच्या दोन दिवसाच्या पाहणी नंतर शहराला पथकाने हगणदारी मुक्त असल्याचा अहवाल दिला.ओल्या, सुक्या कचऱ्यासाठी डबेमहापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवणार आहेत. त्यापैकी प्रत्येक घरांना ओल्या-सुक्या कचरा ठेवण्यासाठी स्वतंत्र डबे विनामूल्य देणार आहे. तसेच स्वच्छतेबाबत वर्षभर जनजागृती अभियान सुरू ठेवण्याचा मानस मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी व्यक्त केला. प्रत्येक चौक व सोसायटीजवळ मोठी कचरा पेटीही ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्थाशहर हगणदारीमुक्त झाल्याचे राज्यस्तरीय पथकाने जाहीर केले आहे. तरीही काही सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यातील सांडपाणीरस्त्यावर वाहते. सहा महिन्यात ५५० सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती केल्याचा दावा मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी केला आहे.