शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिकेचे होंडाच्या बांधकामाला अभय

By admin | Updated: August 30, 2016 02:38 IST

रस्ता रुंदीकरणातील अनेक घरे तसेच दुकाने जमीनदोस्त करतानाच महापालिकेने होंडाच्या दुमजली अवैध बांधकामाला अभय देत केवळ एमआरटीपी गुन्हा दाखल केला.

उल्हासनगर : रस्ता रुंदीकरणातील अनेक घरे तसेच दुकाने जमीनदोस्त करतानाच महापालिकेने होंडाच्या दुमजली अवैध बांधकामाला अभय देत केवळ एमआरटीपी गुन्हा दाखल केला. यामुळे रुंदीकरणाआड येत असलेल्या ४०० पेक्षा जास्त अवैध बांधकामांना राजाश्रय मिळाल्याची टीका होत आहे. पालिकेने यापूर्वीच शेकडो बांधकामांना नोटिसा देऊन कारवाईचे संकेत दिले. मात्र, पाडकाम कारवाईला व्यापाऱ्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केल्याने पालिका मात्र हतबल झाली आहे.शहरातील शांतीनगर येथील होंंडा शोरूमवाल्याने रुंदीकरणाच्या नावाखाली दुमजली इमारत उभी केली. त्याविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर पालिकेने नोटिसा पाठवून पाडकाम कारवाई सुरू केली. याला विरोध करीत राजकीय नेत्यांची दबंगगिरी सुरू झाली. अखेर, पालिकेने नमते घेत कारवाई थांबवली. यापूर्वीच्या कारवाईमुळे उपायुक्त नितीन कापडणीस यांची बदली झाल्याची चर्चा आहे. आयुक्त मनोहर हिरे यांच्या आदेशानंतर प्रभाग अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षण मिळत नसल्याचे कारण देत कारवाई मागे घेत केवळ एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला. उल्हासनगर पालिकेने डिसेंबर महिन्यात कल्याण-अंबरनाथ महामार्गाचे १०० फुटी रुंदीकरण केले. एक हजारांपेक्षा जास्त दुकाने तसेच घरे या रुंदीकरणात बाधित झाली. पालिकेने बाधित व्यापाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन दुरुस्तीची परवानगी तोंडी दिली. याचा गैरफायदा भूमाफिया, व्यापारी, दलाल, बिल्डर आणि राजकीय पक्षांतील तथाकथित नगरसेवकांनी घेतला आहे. बाधित व्यापाऱ्यांसह इतरांनी कोणतीही परवानगी न घेता बहुमजली बांधकाम सुरू केले. यामध्ये स्थानिक नेते, नगरसेवक, बिल्डर, दलाल, पालिका अधिकारी गब्बर झाले असून राजाश्रयामुळे आता अवैध बांधकामांवर एमआरटीपीसारखी थातूरमातूर कारवाई होणार असल्याची चर्चा शहरात आहे. (प्रतिनिधी)