शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेला मिळाला नगररचनाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:51 IST

गुडगुडे यांनी स्वीकारला पदभार : कामाला मिळणार आता चालना

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेच्या वादग्रस्त नगररचनाकार विभागाला ए.पी. गुडगुडे यांच्या रूपाने नगररचनाकार मिळाला असून त्यांनी गुरुवारी नगररचनाकारपदाचा पदभार स्वीकारला. धोकादायक इमारती व बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया यापूर्वी त्यांनी सुरू करून पालिकेला १० कोटींचे उत्पन्न मिळवून दिले होते.

महापालिका नगररचनाकार नेहमीच वादात राहिला आहे. यापूर्वीचे बहुतांश नगररचनाकार कोणत्या ना कोणत्या वादात सापडले असून अनेकांवर गुन्हे दाखल होऊन जेलची हवा खावी लागली आहे. चार वर्षांपूर्वी पुणे येथे बैठकीला गेलेले तत्कालीन नगररचनाकार संजीव करपे बेपत्ता झाले. अद्यापही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यांच्या कुटुंबाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. गेल्या वर्षी त्यांच्या सहीने बांधकाम परवान्याला मंजुरी मिळाल्याचा प्रकार उघड झाल्याने पुन्हा विभागाचा सावळागोंधळ उघड झाला होता. करपे यांच्या बेपत्ता झाल्याच्या प्रकरणानंतर येथे कोणताही नगररचनाकार येण्यास धजावत नव्हता. मध्यंतरी, आलेले नगररचनाकारही वादात सापडले.

शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न प्रलंबित असून बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रियाही ठप्प पडली होती. यापूर्वी गुडगुडे नगररचनाकारपदी असताना बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. शंभरपेक्षा जास्त बांधकामे नियमित होऊन पालिकेला १० कोटींच्या दंडात्मक कारवाईतून उत्पन्न मिळवून दिले होते. तसेच दरमहा कोट्यवधींचा महसूल पालिकेला मिळत होता. मात्र, गेल्या चार वर्षांपासून नगररचनाकार विभगापासून मिळणारे उत्पन्न ठप्प झाले. दरम्यान, भिवंडी महापालिकेचे नगररचनाकार प्रकाश देव यांच्याकडे प्रभारी नगररचनाकारपदाचा पदभार दिला होता. मात्र, त्यांनी अपवाद सोडल्यास महापालिकेच्या कामकाजाकडे पाठ फिरवली होती. महापालिकेला कायमस्वरूपी नगररचनाकार द्या, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारकडे केली होती.

‘शहर विकासासाठी हवे सहकार्य’शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांचे सहकार्य हवे. नवीन बांधकाम परवानगी, धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढणे आदी अनेक कामे करावी लागणार आहेत. विभागाचे काम अनेक दिवसापांसून ठप्प असल्याने त्याचाही निपटारा करावा लागणार आहे, असे गुडगुडे यांनी सांगितले.