शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर भाजपाची प्रचाराची धुरा उपऱ्यांकडे

By admin | Updated: February 14, 2017 02:58 IST

महापालिका निवडणुकीची धुरा शहराबाहेरील भाजपा पदाधिकारी व आमदारांनी घेतली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार

सदानंद नाईक / उल्हासनगरमहापालिका निवडणुकीची धुरा शहराबाहेरील भाजपा पदाधिकारी व आमदारांनी घेतली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, माजी जिल्हाध्यक्ष पूर्णिमा कबरे यांच्यासह अनेक पदाधिकारी शहरात डेरेदाखल झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे नियोजन होणार आहे. माजी आमदार व जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी, नरेंद्र राजानी यांच्यासह वरिष्ठ नेते त्यांना मदत करणार आहेत.उल्हासनगर महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांतील पदाधिकाऱ्यांना विविध विभागांची जबाबदारी दिली आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली निवडणूक होणार असून आमदार नरेंद्र पवार, पूर्णिमा कबरे यांनी विविध प्रभागांत जाऊन प्रभागांतील उमेदवार व त्यांच्या प्रचाराचा आढावा घेतला.ओमी कलानी टीमचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार असून पश्चिमेत ३५, तर पूर्वेत १२ नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. सिंधीबहुल प्रभागात भाजपाची टक्कर साई पक्षासोबत, तर मराठी परिसरात शिवसेनेसोबत आहे.१५ फेब्रुवारीपासून प्रचाराचा धुरळा उडणार असून रॅली व सभांचे आयोजन केल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. मराठी परिसरात आयलानी यांचा चेहरा चालणार नसल्याने आमदार नरेंद्र पवार व पूर्णिमा कबरे यांना पुढे केले. तर, पूर्वेत पक्षाचे मास्टरमाइंड राजा गेमनानी व नगरसेवक राजा वानखडे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. भाजपाच्या विद्यमान ११ पैकी २ नगरसेवक पूर्वेतून, तर ९ पश्चिम विभागांतून निवडून आले होते. ओमी टीम व भाजपाने पश्चिम विभागात विद्यमान ३४ तर पूर्वेत ५ नगरसेवकांना पक्षाने निवडणूक रिंगणात उतरवले आहे. सत्तेसाठी ४० चा जादूई फिगर गाठण्यासाठी पक्षाने पश्चिमेतून, ३५ तर पूर्वेतून १२ नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा केला आहे.चौक सभा व रॅलीवर भर ओमी कलानींमुळे मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांनी शहराकडे पाठ फिरवल्याने प्रचाराची धुरा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आली असून त्यांनी कल्याण, अंबरनाथ, बदलापूर व इतर शहरातील पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी चौक सभा व रॅलीवर भर दिला असून १५ फेबु्रवारीपासून प्रचाराची धुरळा उडणार आहे. सिंधी परिसरात ओमी कलानी यांना सोबत ठेवणार असून इतर मराठी परिसरात आमदार नरेंद्र पवार इतर पदाधिकाऱ्यांना पुढे केले जाणार आहे.