शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारच्या दोन गावांना आता शुद्ध पाण्याचा ‘अमृतकलश’

By admin | Updated: January 12, 2016 00:32 IST

शहराबरोबर ग्रामीण भागात पिण्यास शुद्ध पाणी मिळणे तसे अवघडच असते. परंतु, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन व्यावसायिक संघटनेच्या मदतीने ग्रामीण भागाला ते देण्याचे निश्चित केले आहे.

- अजित मांडके,  ठाणेशहराबरोबर ग्रामीण भागात पिण्यास शुद्ध पाणी मिळणे तसे अवघडच असते. परंतु, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन व्यावसायिक संघटनेच्या मदतीने ग्रामीण भागाला ते देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, जव्हार तालुक्यातील चौक आणि जंगलपाडा गावातील ३०० घरांना आता २४ तास शुद्ध पाण्याची चव चाखण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अमृतकलश या योजनेच्या माध्यमातून येथील गावात ५ आणि ३ हजार लीटरच्या दोन टाक्या बसविल्या असून त्यातून येथील प्रत्येक कुटुंबाला अवघ्या दोन रुपयांत रोज २० लीटर शुद्ध पाणी मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्रामसभेने ठराव करूनच रोज दोन रुपये देण्याचे निश्चित केले आहे.ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना आजही शुद्ध पाणी मिळत नसल्याने विहिरी, बोअरवेल अथवा झऱ्यांच्या पाण्यातून आपली पाण्याची तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे हागवण, डायरिया, उलट्या असे अनेक आजार येथील रहिवाशांना होत आहेत. त्यात लहान मुलांचे प्रमाण हे अधिक आहे. परंतु, आता काही व्यावसायिक संघटनांनी यासाठी पुढाकार घेऊन सामाजिक संस्थांच्या मदतीने अशा ग्रामीण भागांना २४ तास पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, जव्हार तालुक्यातील चौक आणि जंगलपाडा या गावांतील ३०० घरांना अमृतकलशच्या माध्यमातून २४ तास शुद्ध पाणी मिळणार आहे.या योजनेचा शुभारंभ आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी व्यावसायिक संस्थेचे प्रमुख रवी राजपुरोहित आणि विजय भैलुमे यांच्यासह आमदार रूपेश म्हात्रे, कैलास लिंगायत आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.असे मिळणार शुद्ध पाणी...येथील बोअरवेलमधील पाणी उचलले जाऊन ते जलशुद्धीकरण केंद्रात सोडले जात आहे. त्यानंतर, त्यावर प्रक्रिया करून ते येथील टाकीत सोडण्यात येत आहे. त्यानंतर, प्रत्येक कुटुंबाला दिलेले एटीएमकार्ड स्वॅप केल्यानंंतर प्रत्येक दिवसाला २० लीटर शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे. दरदिवशी २ रुपये मोजावे लागणारया योजनेची देखभाल आणि दुरुस्ती ही गावातील मंडळीकडूनच केली जाणार आहे. त्यामुळे या दुरुस्तीचा खर्च निघावा म्हणून दरदिवशी प्रत्येक घराला दोन रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे येथील रहिवाशांनीदेखील त्याला मंजुरी दिल्याने महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे अगदी माफक दरात शुद्ध पाणी उपलब्ध झाले असून मुंबई, ठाण्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.