शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेती कार्यशाळेत दोनशे शेतकरी

By admin | Updated: September 14, 2016 04:15 IST

डहाणू तालुक्यातील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात आत्मा योजने अंतर्गत दोन दिवसीय सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते

अनिरुद्ध पाटील , डहाणू/बोर्डीडहाणू तालुक्यातील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात आत्मा योजने अंतर्गत दोन दिवसीय सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डहाणू आणि तलासरी तालुक्यातील दोनशे शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. आत्मा प्रकल्पाचे संचालक चांदवडे आणि कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेतून सेंद्रिय शेतीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते. डहाणू तालुक्यातील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात ८ व ९ सप्टेंबर रोजी दोन दिवासीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या करिता डहाणू आणि तलासरी तालुक्यातील प्रत्येकी दोन गटांचे मिळून दोनशे शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. आत्मा योजनेचे प्रकल्प संचालक चांदवडे हे प्रमुख मार्गदर्शक होते. या वेळी कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ भरत कुशारे यांनी मशागत, लागवड आणि पीक पद्धतीवर तर उत्तम सहाणे यांनी किडरोगाचे नियंत्रण या विषयी माहिती दिली. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात सेंद्रिय शेतीकरिता उपयुक्त जिवामृत व दशपर्णी अर्क बनविण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांंना दाखविण्यात आले. प्राध्यापक अशोक भोईर यांनी खत व माती परीक्षण आणि प्राध्यापक रूपाली देशमुख यांनी सेंद्रिय भाजीपाला व फळांचे दैनंदिन आरोग्यातील महत्व विषद केले. मंडळ कृषी अधिकारी अनिल नरगुलवार यांनी सेंद्रिय शेतीतील विविध योजना समजावून सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा योजनेचे तालुकस्तरीय व्यवस्थापक नामदेव वाडिले यांनी केले. या कार्यशाळेला उपस्थित चार शेतकरी गटांचे गटप्रमुख वसंत कुवरा, किसान धांगडा, रोशन वरखंडे, विजय दळवी आणि उपस्थित दोनशे शेतकऱ्यांंनी या प्रशिक्षणामुळे सेंद्रिय शेतीला गती मिळून भरघोस उत्पन्न मिळेल असा आशावाद व्यक्त केला.