शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जुने सोने देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

ठाणे : वापी येथील जुन्या वाड्यामध्ये सोन्याचा हार सापडला असून त्याची विक्री करण्याचा बहाणा करून चार लाखांची फसवणूक करणाऱ्या ...

ठाणे : वापी येथील जुन्या वाड्यामध्ये सोन्याचा हार सापडला असून त्याची विक्री करण्याचा बहाणा करून चार लाखांची फसवणूक करणाऱ्या धानी अजय सोलंकी उर्फ मारवाडी (३२, रा. विक्रोळी, मुंबई) आणि किसन मारवाडी उर्फ सुनील (६०) या ‘बंटी बबली’ला वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून ७० हजारांची रोकड जप्त केली आहे.

वागळे इस्टेट, लुईसवाडीतील रहिवासी अशोक भिरुड (५८) यांच्याशी धानी आणि किसन यांच्यासह चौघांनी ४ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या घरी भेट घेतली. त्यांना आपले नाव दीपाली आणि सुनील असे सांगितले. त्यांच्या घरी गेल्यानंतर आपण नागपूर येथील आनंद मिशन आश्रमाचे कार्यकर्ते असल्याचे सांगून त्यांचा त्यांनी विश्वास संपादन केला. वापी येथे जुन्या वाड्यात सोन्याचा हार सापडला असून त्याची विक्री करायची आहे. त्यासाठी दोन सोन्याचे मणी अशोक यांना देऊन ते त्याच हारातील असल्याचेही त्यांनी भासविले. नंतर त्यांना २७ जानेवारी आणि २ फेब्रुवारी २०२१ रोजी ठाण्यातील कोपरी येथील श्रीमॉबाल निकेतन येथे बोलावून तिथेच त्यांना हा खोटा पितळी अष्टपैलू मण्यांचा हार देऊन त्याबदल्यात चार लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी भिरुड यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ए. जे. वळवी यांच्या पथकाने धानी सोलंकी आणि किसन मारवाडी या दोघांना १५ मे रोजी अटक केली. त्यांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. आता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. दरम्यान, त्यांच्याकडून प्रकाश मौर्या यांच्यामार्फत ५० हजार तर रुपा राठोड यांच्यामार्फत २० हजारांची रोकड हस्तगत केली आहे. त्यांच्या आणखी दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.