शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रायमॅक्स’ला तीन महिन्यांची मुदतवाढ

By admin | Updated: May 9, 2017 00:56 IST

लाखो रुपये बिलाच्या थकबाकीप्रकरणी ट्रायमॅक्स कंपनीकडून सेवा देताना टाळाटाळ केली जात असताना दुसरीकडे याच कंपनीला

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : लाखो रुपये बिलाच्या थकबाकीप्रकरणी ट्रायमॅक्स कंपनीकडून सेवा देताना टाळाटाळ केली जात असताना दुसरीकडे याच कंपनीला मुदतवाढ देण्याचा निर्णय परिवहन समितीने शनिवारी घेतला. बहुचर्चेनंतर तीन महिन्यांची मुदतवाढ देताना याबाबतचा प्रस्ताव घेण्याच्या अनुषंगाने झालेल्या विलंबाप्रकरणी प्रशासनाला सर्वपक्षीय सदस्यांनी फैलावर घेतले होते. सदस्य रमेश म्हात्रे यांनी तर अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, तरच परिवहनचा कारभार सुधारेल, अशी मागणी करताना परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्यावर तोंडसुख घेतले. ई-तिकीट प्रणालीचे कंत्राट मे. ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीला पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. या कंत्राटाची मुदत शनिवारी संपली. त्यामुळे कंपनीला मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने दाखल केला. परिवहनचे पदसिद्ध सदस्य असलेले स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी सुरुवतीलाच सध्याच्या बसच्या संचालनाचा आढावा घेतला. या वेळी बस आलटूनपालटून वापरल्या जात असल्याचे स्पष्टीकरण टेकाळे यांनी दिले. केडीएमटीत अनेक अधिकारी निष्क्रिय असून त्यांच्या बदल्या करा, अन्यथा परिवहनची अवस्था बैलगाडीसारखी होईल, अशी टीका त्यांनी केली.अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने सदस्य नितीन पाटील यांनी लक्ष वेधले. तर, शनिवारी ई-तिकीट प्रणालीचे कंत्राट संपत असताना ऐनवेळी हा प्रस्ताव मुदतवाढीसाठी का आणला, याआधी याबाबतची कार्यवाही का झाली नाही, असा सवाल पाटील यांनी केला. पाच वर्षांत वेळ मिळाला नाही का, असा जाब म्हात्रे यांनीही विचारला. पाटील आणि सदस्य संजय राणे यांनीही मुदतवाढ देण्यास विरोध केला. परंतु, प्रशासनाच्या विनंतीनंतर मुदतवाढीचा निर्णय झाला. प्रशासनाने तत्काळ नवीन निविदा प्रक्रिया पार पाडावी, असे आदेश सभापती संजय पावशे यांनी या वेळी दिले.