शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘बारवी’तील आदिवासी मदतीपासून वंचित

By admin | Updated: April 1, 2017 23:37 IST

बारवी धरणाची उंची वाढवल्याने गेल्या वर्षी शेकडो कुटुंबे बेघर झाली. या पीडित कुटुंबांना मूलभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री निधीतून सुमारे दोन

मुरबाड : बारवी धरणाची उंची वाढवल्याने गेल्या वर्षी शेकडो कुटुंबे बेघर झाली. या पीडित कुटुंबांना मूलभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री निधीतून सुमारे दोन कोटी रुपये दिले. परंतु, एमआयडीसीने पीडितांना मदत न दिल्याने त्यांच्यात असंतोष खदखदत आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने धरणातील पाण्याच्या साठ्याची क्षमता वाढवण्यासाठी बारवी धरणाची उंची वाढवली. गेल्या वर्षी पडलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे तोंडली, काचकोळी, जांभूळवाडा, मारगवाडी, बुरूडवाडी, देववाडी या वाड्या पाण्याखाली गेल्याने आदिवासींना घर सोडून जावे लागले. विस्थापित झालेल्या पीडित कुटुंबांना मदत मिळावी. त्यांना मूलभूत गरजा मिळाव्यात, म्हणून मुख्यमंत्री निधीतून सुमारे दोन कोटी देण्यात आले. त्या वेळी त्यांना तत्काळ मदत म्हणून १० हजार आणि धान्यही दिले. ज्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यांना प्रत्येक कुटुंबामागे एक ते दीड लाख भरपाई देण्यात आली. एमआयडीसीने पीडित आदिवासी कुटुंबांना रोख मदत किंवा नुकसानभरपाई न देता ती इतर राज्यांत १० वर्षांपासून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना दिली. परंतु, पीडित आदिवासी कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत.या पीडित कुटंबांपैकी श्रीमंतांना बारवी प्रशासनाने मुरबाडमधील सोसायट्यांमध्ये स्थलांतरित केले. त्यांचे भाडेही तेच भरत आहेत. खरोखर बेघर होऊन विस्थापित झालेल्या आदिवासींना स्थलांतरित न करता त्यांची धरणाच्या शेजारीच पत्र्यांच्या शेडमध्ये व्यवस्था करण्यात आली. सध्या येथेच हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत. उन्हाळ््याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात बारवी विभागाचे कार्यकारी अभियंता केंद्रे यांच्याशी संपर्कसाधला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)