शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाची ठाण्यातून यूपीला तस्करी

By admin | Updated: September 11, 2015 00:44 IST

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाची राबोडीतील एका रिक्षाचालकामार्फत थेट उत्तर प्रदेशात विक्री करणाऱ्या जन्मदात्या आईसह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती पथकाने अटक केली

ठाणे : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाची राबोडीतील एका रिक्षाचालकामार्फत थेट उत्तर प्रदेशात विक्री करणाऱ्या जन्मदात्या आईसह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा दिवसांच्या बाळासह दहा हजारांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.राबोडीतील कत्तलखान्याजवळ आलिया नावाची महिला तिच्या दहा दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मध्यवर्ती शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांना मिळाली होती. त्याआधारे, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक वसंत कांबळ आदींच्या पथकाने कत्तलखान्यासमोरील रस्त्यावर आलिया ऊर्फ अकसाना मोमिन (बदललेले नाव), रा. मुंब्रा हिला ताब्यात घेतले. आलिया आणि रिझवाना ऊर्फ रिझ्झो मोहंमद रफिक शेख यांनी हे मूल संगनमताने राबोडीतील हसनयन ऊर्फ मुन्नाभाई महंमद सईद शेख (४८) यांच्याकडे सोपविले. शेखची मानलेली बहीण सहाना अजगर उस्मानी (३७) रा. राबोडी, ठाणे हिची उत्तर प्रदेशातील (बिजनोर, धामपूर) येथील भाची उजमा उम्मानी हिला हे मूल देण्यात येणार होते. त्यापोटी सहाना हिच्याकडून शबानाने दहा हजार रुपये रोख घेतले. या संपूर्ण व्यवहारासाठी कलीम अब्बास ताहीर हुसेन (२८) या रिक्षाचालकाने मध्यस्थी केली. पोलिसांनी शबानासह रिझवाना, हसनयन, कलीम आणि सहाना या पाचही जणांना अटक केली आहे. या बाळाला आता नवी मुंबईतील विश्व कल्याण केंद्र चाइल्ड केअर सेंटर यांच्या ताब्यात देण्यात आले असून यातील पाचही आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. (प्रतिनिधी)