शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

महामार्गावरील वाहतूक अखेर सुरू

By admin | Updated: November 15, 2015 23:53 IST

मुंबई - गोवा : अपघातग्रस्त टँकरमधील गॅस गळती रोखण्यात यश

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस भरून वेर्णे-गोवा येथे निघालेल्या टँकरला अपघात झाल्याने गळती झाली. यामुळे महामार्गासह परिसरातील मानवी वस्तीला धोका निर्माण झाला होता. मात्र, लोटे येथील घरडा केमिकल कंपनी आणि विनीत आॅरगेनिक कंपनीच्या रसायनतज्ज्ञांनी तसेच उरण येथील न्हावा शेवा येथील पेट्रोलियम कंपनीच्या गॅसविरोधकतज्ज्ञांनी सुमारे २१ तास शर्थीचे प्रयत्न केल्यांनतर रविवारी सकाळी पावणेआठ वाजता ही गॅस गळती थांबवण्यात यश मिळवले. शनिवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास दोन आयशर टेम्पोला बाजू देण्याच्या प्रयत्नात टँकरचालक रवी मच्छिंद्र विटकर (अहमदनगर) याचे टँकरवरील नियंत्रण सुटले. यामुळे गाडी रस्त्यांच्या बाजूला गेली आणि उलटली. गॅसची टाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दगडावर आपटल्याने गॅस गळती सुरू झाली. टँकरच्या पुढील बाजूस असलेला हौदा रस्त्यावरच पडला.यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तो बचावला. अपघाताचे वृत्त समजताच कशेडीचे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक आऱ व्ही. माने, पोेलीस हेडकॉन्स्टेबल आर. के. कांबळे, बी. आर. कांबळे, चालक आर. एस. हसबे, खेड येथील पोलीस निरीक्षक अशोक जांभळे आणि सहकारी यांनी तत्काळ दोन्ही बाजूच्या सर्व वाहनांना १ किमी अंतरावरच थांबण्यास सांगितले.ठिकठिकाणी पोलिसांनी गांभीर्याने ही परिस्थिती हाताळली. तसेच आसपासच्या मानवी वस्तीस इजा होऊ नये, याकरिता गावातील ग्रामस्थांकरवी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. याचा चांगला परिणाम झाला. महामार्गावरील ही अवघड परिस्थिती लक्षात घेता अनिश्चित काळासाठी वाहने थांबवली. पोलिसांनी लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा कंपनी आणि विनीत कंपनीच्या पथकाला पाचारण केले.हे पथक दुपारी ३ वाजता दाखल झाले. मात्र हे पथक रसायनतज्ज्ञांचे असल्याने या तज्ज्ञांनी गॅस गळती थांबवण्यास असमर्थता दर्शवली. तरीही त्यांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपले शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवले.काही अंशी त्यांचे प्रयत्न सफल ठरले. मात्र पूर्णत: गॅस गळती न थांबल्याने उरण येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या विशेष गॅस तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. हे पथक सायंकाळी ६ वाजता दाखल झाले. तेव्हापासून या पथकांनी आपले शर्थीचे प्रयत्न करीत तब्बल १३ तासानंतर रविवारी सकाळी ७.४५ वाजता ही गॅस गळती पुर्णपणे थांबवली. यामध्ये घरडा कंपनी आणि विनीत कंपनीच्या पथकाचे 4 तासाचे प्रयत्न आणि उरण येथील या पथकाचे १३ तासाचे प्रयत्न म्हणजेच एकूण १७ तासानंतर ही गळती थांबवण्यात या सर्व पथकाना यश मिळाले आहे. उरण येथील पेट्रोलियम कंपनीचा एक रिकामा टँकर सायंकाळी ६ वाजताच कशेडी येथे दाखल झाला. याच रिकाम्या टँकरमध्ये हा गॅस भरण्यात आला. मात्र गॅस अन्य टँकरमध्ये भरण्यासाठी मोठे कष्ट उपसावे लागले. टाकीमधील गॅस काढण्यासाठी ५ अग्निशमन दलाच्या गाड्यातील २० हजार लिटर पाणी खर्च झाले. टाकीतील वरवरचा गॅस अन्य टँकरमध्ये घेतल्यानंतर तळाशी राहिलेला गॅस बाहेर काढणे आवश्यक होते. याकरीता टाकीच्या तळाशी साचलेला गॅस काढण्यासाठी या टाकीमध्ये २० हजार लिटर पाण्याचा वापर करावा लागल्याची माहीती कशेडी पोलीसांनी दिली़ गॅस संपूर्णपणे अन्य टँकरमध्ये घेतल्यानंतर पोलिसांसह उपस्थित तज्ज्ञांनी आजुबाजुच्या गवतावर व रस्त्यावर पसरलेल्या गॅसची पाहणी केली. तसेच असलेला गॅस तज्ज्ञांच्या सहाय्याने नष्ट करण्यात आला. परिसर रिकामा केल्यानंतर तब्बल २१ तासानंतर रविवारी सकाळी ८.४५ वाजता दोन्ही बाजूची वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दोन वर्षापूर्वी कशेडी घाटातच गॅस वाहुन नेणाऱ्या टँकरला अपघात होवून गॅस गळती झाली होती. त्यावेळीही अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी एवढी भीषणता नव्हती. मात्र शनिवारच्या या अपघातानंतर झालेली गॅसगळती भयानक आणि दिर्घकाळपर्यंत थांबल्याने मोठी भिती निर्माण झाली होती.(प्रतिनिधी)वाहनचालकांचा निश्वास : रिकाम्या टँकरमध्ये भरला गॅसवायूगळती कमी करण्यासाठी एक रिकामा टँकर मागवण्यात आला होता. या टँकरमध्ये गळती होणारा वायू सोडण्यात आला. हे जोखमीचे काम पूर्ण झाल्यानंतर ही गळती आटोक्यात आली. त्यामुळे एक संकट टळले.जीव होता मुठीतएकवीस तास परिसरातील ग्रामस्थांनी तसेच वाहनचालकांनी अक्षरश: जीव मुठीत धरून काढले. कारण वायूगळतीमुळे कोणत्याही क्षणी त्रास होऊ शकणार होता. अखेर हे संकट टळल्याने परिसरातील ग्रामस्थांनी निश्वास टाकला.२१ तासांच्या प्रयत्नांना यश.पोलिसांसह अग्निशमन दल आणि उरण येथील तज्ज्ञांचे अथक प्रयत्न.२० हजार लीटर पाण्याचा वापर.