शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील वाहतूक कोंडी सुटणार? मीरा भाईंदरमधील चार रस्ते- एमएमआरडीएमार्फत अभ्यास सुरू

By admin | Updated: June 9, 2015 03:40 IST

वाहतुकीला पर्यायी रस्ते निर्माण करण्यासाठी पालिकेने प्रस्तावित केलेल्या चार पर्यायी रस्त्यांच्या अभ्यासाला मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे.

भाईंदर : झपाट्याने विकसित होत असलेल्या मीरा-भाईंदर शहरांतील वाहतुकीचे रस्ते वाढत्या वाहनांच्या प्रमाणात तोकडे पडत आहेत. वाहतुकीला पर्यायी रस्ते निर्माण करण्यासाठी पालिकेने प्रस्तावित केलेल्या चार पर्यायी रस्त्यांच्या अभ्यासाला मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांवर गेली असताना वाढत्या शहरीकरणामुळे येथील वाहनांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे. वाहनांच्या तुलनेत येथील रस्ते तोकडे पडत असून केवळ एका मुख्य मार्गावरूनच शहरात ये-जा करता येते. शहरांतर्गत वाहतुकीचे अनेक मार्ग उपलब्ध असले तरी ते अरुंद असल्याने तेथील वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. ती मार्गी लावण्याच्या उद्देशाने पालिकेने भुयारी वाहतूक मार्गाच्या पि›मेकडील वाहने उत्तन, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व मीरा रोडमार्गे दहिसर लिंक रोडने निर्गमित करण्यासाठी तीन रस्ते प्रस्तावित केले आहेत. त्यात भाईंदर (प.) रेल्वे स्थानक येथून नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाकडे जाणारा रस्ता, पुढे मीरा रोडमार्गे दहिसर येथून जाणारा रेल्वे समांतर लिंक रोड तर दुसरा उत्तन-गोराईमार्गे मनोरीकडे जाणारा रस्ता, मोर्वा गावापर्यंतच्या बायपास रोडचा समावेश आहे. तसेच भुयारी मार्गाच्या पूर्वेकडील वाहने जेसल पार्क ते घोडबंदरमार्गे भाईंदर खाडी समांतरित पि›म महामार्गाला जोडणार्‍या ३० मीटर रुंदीच्या रस्त्याचा समावेश आहे. हे रस्ते एमएमआरडीएमार्फत विकसित करण्यात यावे, यासाठी आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २२ डिसेंबर २०१४ रोजी पत्रव्यवहार केला होता. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाने एमएमआरडीएला १६ एप्रिल २०१५ रोजी पत्र पाठविल्याने एमएमआरडीएने २६ मे २०१५ रोजी पाठविलेल्या प्रत्युत्तरात प्रस्तावित चार रस्त्यांच्या अभ्यासाला सुरुवात केल्याचे म्हटले आहे. ............