शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ठाण्यात २१ मार्गांवर टीएमटीची ‘महिला स्पेशल’ धावणार!

By admin | Updated: May 31, 2016 03:06 IST

मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवांना महिला स्पेशल बस सुरू करण्याची सूचना केल्यानंतर आता ठाणे परिवहन सेवेने त्यानुसार पावले उचलली आहेत

ठाणे : मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवांना महिला स्पेशल बस सुरू करण्याची सूचना केल्यानंतर आता ठाणे परिवहन सेवेने त्यानुसार पावले उचलली आहेत. कोणत्या मार्गांवर किती महिला प्रवासी रोज टीएमटी बसने प्रवास करतात, कोणत्या रूटवर महिलांची संख्या अधिक आहे, याचीही चाचपणी केली जात आहे. यासाठी टीएमटीने गेल्या आठवड्यात २१ रूटची चाचपणी करून याच मार्गांवर महिला स्पेशल सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक चर्चा केली आहे. परंतु, हे मार्ग आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने योग्य ठरू शकतात का, याचाही अभ्यास केला जात आहे. आधीच आमदनी घटल्याने परिवहनचे उत्पन्न आणि खर्चाचे गणित बिघडलेले आहे. त्यात, या स्पेशलला महिलांचा कितपत प्रतिसाद लाभणार, हेदेखील पाहण्यात येणार आहे. कारण आधीच तोट्यात आणि बसची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांना चांगली सुविधा देण्यात टीएमटी अपयशी ठरली आहे. त्यामुळे या महिला स्पेशलचा फायदा होईल का, याबाबत प्रशासनातच संभ्रमाचे वातावरण आहे.ठाणे परिवहन सेवेत ३१३ बस असून त्यातील सुमारे १०० हून अधिक आजघडीला बंद अवस्थेत आहेत. काही बस तर किरकोळ कारणांसाठी मागील कित्येक महिन्यांपासून आगारात धूळखात पडून आहेत. वागळे आणि कळवा आगारांतून रोज १८० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत. रस्त्यांवर धावणाऱ्या अपुऱ्या बसमुळे प्रवाशांची संख्यादेखील मागील काही वर्षांत कमी झाली आहे. काही मार्गांवर तर आजही अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रवाशांना बसची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे आता प्रवाशांना इतर पर्यायांचा वापर करावा लागत आहे.