शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा-भिवंडी मार्गावर धावणार टीएमटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:57 IST

आजपासून हाेणार प्रारंभ : नोकरदार, व्यावसायिकांना दिलासा  

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे, मुंब्रा येथून भिवंडी शहर व परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भिवंडीसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती, ती लक्षात घेऊन ठाणे महापालिका परिवहन सेवेने (टीएमटी) शुक्रवारपासून मुंब्रा पोलीस ठाणे ते शिवाजी चौक भिवंडी मार्ग क्र. ८४ वर नव्याने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन सभापती विलास जोशी यांनी दिली.

मागील काही वर्षांत ठाण्याबरोबरच मुंब्रा, दिवा येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ठाण्याअंतर्गत दळणवळणाची व्यवस्था व्हावी, यासाठी टीएमटीतर्फे विविध मार्गांवर बससेवा सुरू आहेत. भिवंडी येथे अनेक उद्योगधंदे असून ठाण्याच्या सर्वच भागांतून नागरिक येथे दैनंदिन ये-जा करतात. मुंब्रा येथील नागरिकांना भिवंडी येथे जाणे शक्य व्हावे, यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते शानू पठाण, परिवहन समिती सदस्य शमीम खान व बालाजी काकडे यांनी परिवहन समितीकडे केली होती. त्याची दखल घेऊन प्रायोगिक तत्त्वावर मार्ग क्र. ८४ वर बससेवा शुक्रवारपासून सुरू होत असल्याची माहिती जोशी यांनी दिली. 

मुंब्रा पोलीस ठाणे ते शिवाजी चौक (भिवंडी) मार्ग क्र. ८४ एकूण बसफेऱ्या २०. वेळ : ७.००, ७.३०, ८.००, ८.३०, ९.००, १०.००, १०.४०, ११.१०, ११.४०, १२.१०, १४.५०, १५.२०, १५.५०, १६.२०, १६.५०, १८.००, १८.३०, १९.००, १९.३० व २०.००. 

शिवाजी चौक (भिवंडी) ते मुंब्रा पोलीस ठाणे दरम्यान एकूण २० फेऱ्या. वेळ : ८.२०, ८.५०, ९.२०, ९.५०, १०.२०, ११.३०, १२.००, १२.३०, १३.००, १३.३०, १६.१०, १६.४०, १७.४०, १८.१०, १९.२०, १९.५०, २०.२०, २१.२०.