शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 02:39 IST

उल्हासनगरमधील घटना : मनसे पदाधिकाऱ्याचे कृत्य 

उल्हासनगर : प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मनसे विभागप्रमुख योगीराज देशमुख यांनी दुपारी दगडफेक केली. या हल्ल्याचा शहरातून निषेध व्यक्त हाेत असून प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मध्यवर्ती पाेलिसांनी त्यांना अटक केली असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डी. टी. टेळे यांनी दिली.

सरकारी आरक्षित भूखंडावर बांधकाम होत असल्याच्या तक्रारींची दखल न घेतल्याने ही कृती केल्याची कबुली देशमुख यांनी दिली. तर देशमुख कोरोना काळात भेटले नसून त्यांच्या तक्रारी प्रलंबित नसल्याचे गिरासे यांनी पत्रकारांना सांगितले. उल्हासनगर प्रांत कार्यालय प्रांगणात उभ्या असलेल्या प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मनसे विभागप्रमुख योगीराज देशमुख यांनी हा हल्ला केला.  दगड लागून गाडीची काच फुटली आहे. देशमुख यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून राज्य शासनाच्या आरक्षित भूखंडावर शासनाचा नामफलक लावूनही बेकायदा बांधकामे सुरू आहेत, अशी तक्रार प्रांत कार्यालयाकडे केली. मात्र, त्याकडे प्रांताधिकारी कार्यालयाने दुर्लक्ष करून मला कार्यालयात येण्यास मज्जाव केला, असे म्हटले आहे.

‘पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेतील ’n मंगळवारी दाखल केलेल्या तक्रारीबाबत विचारणा करण्यासाठी प्रांत कार्यालयात गेल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या निषेधार्थ प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीवर दगड भिरकावल्याची कबुली योगीराज देशमुख यांनी दिली. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी प्रांताधिकारी यांच्या गाडीवरील हल्ल्याचा निषेध केला असून पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेतील, असे सांगितले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर