शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीत छताचे प्लास्टर पडून तीन जण जखमी

By जितेंद्र कालेकर | Updated: June 16, 2024 18:26 IST

त्या तिघांना तात्पुरत्या स्वरुपात त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळव्यात स्लॅब पडल्याची घटना ताजी असताना, कोपरीतील सुमारे ३० ते ३५ वर्षे जुने बांधकाम असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या छताचे प्लास्टर पडल्याची घटना रविवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत प्रदीप मोहिते (४६), यश मोहिते. (१६) आणि निधी मोहिते (१२) हे तिघे जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडले आहे. याठिकाणच्या २० सदनिकांमधील दहा आणि १२ सदनिकांमध्ये प्लास्टरला व कॉलमला तडे गेले आहेत. त्या तिघांना तात्पुरत्या स्वरुपात त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

कोपरीच्या मीठबंदर रोड या ठिकाणी तळ अधिक चार मजली श्रमदान सोसायटी ही प्रशासकीय इमारत आहे. या इमारतीच्या दुसºया मजल्यावरील रूम नं. दहा च्या छताचे प्लास्टर कोसळल्याची माहिती सागर व्यक्तीने फोनवरून रविवारी पहाटेच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिका अधिकाऱ्यांसह पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तातडीने जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचासाठी दाखल केले. तिघांच्या पायांना मार लागला आहे.

या इमारतीत २० सदनिका आहेत....

ही इमारत सी ३ अति धोकादायक मधील असून त्यांना नोटीस बजावलेली होती. इमारतीत एकूण २० - सदनिका असून तळ मजल्यासह चार मजल्यावर प्रत्येकी चार सदनिका आहेत. त्यातील १० ते १२ सदनिकांमध्ये प्लास्टरला व कॉलमला तडे गेले आहेत. इमारतीवरती ठामपा बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्याकडून पुढील कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. श्रमदान सोसायटी इमारत क्रमांक तीन मध्ये एकूण अंदाजे ६० ते ६५ व्यक्ती राहत होत्या, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे