शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी आनंद नगर, गांधी नगर भागातील ५३ लोकांना विलगीकरण कक्षात केले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 23:32 IST

एका वृध्द महिलेच्या संपर्कात आलेल्या तब्बल ५३ नागरीकांना पालिकेने खरबदाराची उपाय म्हणून घोडबंदर भागातील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. आता त्यांची तपासणी करुन पुढील दिशा ठरविली जाणार आहे.

ठाणे - कोरोना व्हायरसचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने विविध पावले उचलली आहेत. दुसरीकडे कोपरीतील आनंद नगर आणि गांधी नगर भागातील तब्बल ५३ नागरीकांना पालिकेने रात्री उशिरा कासारवडवली येथील विलगीकरण कक्षात ठेवले असल्याची बाब समोर आली आहे. यातील पाच ते सात जण हे मुंलुड येथील खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या एका वृध्द महिलेच्या संपर्कात आले होते. त्या महिलेचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर पालिकेने हे पाऊल उचलले आहे. तसेच येथील ठाणे- मुलुंडला जोडणारा नाल्यावरील रस्ताही बंद करण्यात आला आहे.मुलुंड भागात राहणारी एक ा वृध्द महिलेच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर सदर महिलेचा रिपोर्ट हा निगेटीव्ह आला होता. परंतु तीला चार दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने उपचारार्थ मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच खाजगी रुग्णालयात ठाणे पूर्वेतील आनंद नगर आणि गांधी नगर भागात राहणारे पाच ते सात नागरीक साफसफाईचे काम करीत होते. दरम्यान त्या महिलेचा रिपोर्ट हा पॉझीटीव्ह आल्यानंतर या नागरीकांच्या मनातही भिती निर्माण झाली. याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला झाल्यानंतर पालिकेने शनिवारी रात्रीच या भागाचा सर्व्हे करुन आनंद नगर आणि गांधी नगर भागातील तब्बल ५३ लोकांना ताब्यात घेऊन घोडबंदर भागातील कासारवडवली येथील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. सावधानतेचा उपाय म्हणून या सर्व नागरीकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील उपाय योजना केल्या जाणार असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून या भागातून मुलुंड येथे जाणारा नाला व त्यावरील रस्ता देखील आता बंद करण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या