शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांवरील कारवाईत कसूर करणारे तीन अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 02:02 IST

स्कायवॉकची पाहणी : गर्दीत आयुक्तांनी खाल्ले धक्के

कल्याण : कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणास जबाबदार धरत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी तिघांवर निलंबनाची कारवाई केली. बुधवारी रात्री दोन्ही स्कायवॉकवर फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना किती त्रास होतो, याचा अनुभव आयुक्तांनी जातीने घेतला. त्यानंतर प्रभाग अधिकारी भरत पवार आणि दीपक शिंदे यांच्यासह फेरीवाला पथक प्रमुख गणेश माने यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले.

बुधवारी सार्वजनिक सुटी असतानाही आयुक्त महापालिका कार्यालयात कामकाजानिमित्त आले होते. आजच्या महासभेची तयारी त्यांनी केली. पटलावर चर्चेसाठी असलेल्या विषयांचा अभ्यास केला. सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास ते मुख्यालयातून बाहेर पडले. मात्र, घरी न जाता त्यांनी डोंबिवली गाठली. डोंबिवली रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावरून ते चालत गेले. या पुलावर फेरीवाल्यांचा बाजार भरल्याने त्यांना गर्दीत धक्के खावे लागले. नव्या आयुक्तांची ओळख नसल्याने फेरीवाले त्यांच्यासमोरच जोरात आवाज देत भाजीपाला विकत होते. त्यानंतर, आयुक्तांनी कल्याणच्या पादचारी पुलाकडे मोर्चा वळवला. याठिकाणीही आयुक्तांना तोच अनुभव आला. पाहणी आटोपल्यानंतर आयुक्त म्हणाले की, माझ्याकडे फेरीवाल्यांसंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून समस्येचे गांभीर्य समजून घेतले. नागरिकांना किती त्रास होतो, याची कल्पना या पाहणीतून आली. फेरीवाले हटविण्याची जबाबदारी ज्या विभागाची आहे, त्यांनी हे काम करावे. अन्यथा, कोणाचीही गय करणार नसल्याचा सज्जड इशारा आयुक्तांनी यावेळी दिला.१४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द : तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांनी पालिकेतील १४ कर्मचाºयांच्या बदल्या केल्या होत्या. या बदल्या आयुक्त सूर्यवंशी यांनी रद्द केल्या. यासंदर्भात उपायुक्त मारुती खोडके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, १४ जणांच्या बदल्या यापूर्वीच्या आयुक्तांनी केल्या होत्या. नव्या आयुक्तांनी त्या रद्द केल्या. १४ पैकी ९ जणांनी बदलीच्या ठिकाणचा पदभार घेतला होता. मात्र, पाच जणांना नगररचना विभागात पाठविले होते. त्यापैकी एकानेही पदभार स्वीकारलेला नाही. सगळ्यांच्याच बदल्या रद्द झाल्याने ते पूर्वी होते, त्याच खात्यात कार्यरत राहणार आहेत.