शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ऐनाचीवाडीत आढळली तीन कुपोषित बालके

By admin | Updated: October 14, 2016 06:40 IST

तालुक्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. आदिवासी भागातील ऐनाचीवाडीमध्ये महिला बालकल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे एकाच

कर्जत : तालुक्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. आदिवासी भागातील ऐनाचीवाडीमध्ये महिला बालकल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे एकाच आदिवासी वाडीत तीन कुपोषित बालके आढळली आहेत. अंगणवाडी सेविका आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका यांची अनुपस्थिती यामुळे कुपोषित बालके यांची प्रकृती खालावत आहे. दरम्यान, त्या तिन्ही कुपोषित बालकांना लोकवर्गणी काढून पोषण आहार देण्यासाठी कर्जत तालुका आदिवासी संघटना सरसावली आहे.खांडस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील ऐनाची वाडीमध्ये तीन कुपोषित बालके आढळली आहेत. नांदगाव ग्रामपंचायतीमधील या वाडीमध्ये मिनी अंगणवाडी आहे, तेथील महिला बालकल्याण विभागाच्या वतीने काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका २०१२ नंतर सेवेत असूनही ऐनाची वाडीतील अंगणवाडीमध्ये फिरकल्या नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत तेथील मदतनीस अंगणवाडीमध्ये दुहेरी जबाबदारी पार पाडत आहेत. मदतनीस या पोषण आहार बनवून देण्यापासून वाडीमध्ये फिरून बालकांना अंगणवाडीत आणणे,आणि त्यांना अंगणवाडीत खिळवून ठेवण्याची कामे करीत आहेत. अंगणवाडी मदतनीस यांची त्यामुळे कसरत होत असून कर्जत महिला बालकल्याण विभागाच्या निष्काळजीपणामुळे तेथील कुपोषण वाढत आहे. त्या भागातील अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि कर्जत तालुक्याचे प्रकल्प अधिकारी यांना पाच वर्षात अंगणवाडी सेविका अंगणवाडीत येत नसताना त्यावर कार्यवाही करावी असे वाटत नसल्याने कर्जत तालुका आदिवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.ऐनाची वाडीतील श्रेयस किरण वाघ, रोहित नाना पादिर आणि ऋ षभ नाना पादिर ही तीन बालके कुपोषित असल्याची माहिती मिळताच कर्जत तालुका आदिवासी संघटनेने वाडीत जाऊन माहिती घेतली. अंगणवाडी सेविका येत नाहीत यामुळे या कुपोषित बालकांवर दुर्लक्ष होत असून या शाळेतील बालकांची आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी असलेल्या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका उपलब्ध नसतात. चई या गावी असलेल्या आरोग्य उपकेंद्रात नियुक्तीवर असलेल्या आरोग्य सेविका यांना राहण्याची सोय जिल्हा परिषदेने करून दिलेली असताना त्या सेविका तेथे राहत नसल्याची तक्र ार आदिवासी संघटनेने केली आहे. अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका यांची अनुपस्थिती आमच्या आदिवासी मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत आहे असे येथील ग्रामस्थांसह संघटनेच्या सदस्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)