शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एका दिवसात तीन कोरोनाच्या रुग्णांची वाढ कोरोना रुग्णांची संख्या झाली १६, मुंब्य्रात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 20:14 IST

शहरात आज दिवसभरात कोरोनाच्या तीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही १६ झाली आहे. त्यात मुंब्य्रातील कौसा भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने आता येथे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सर्वांना प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

ठाणे : कळव्यातील साईबाबा नगर परिसरात अढळलेला ५९ वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाली असतांना शुक्रवारी ठाण्यातील विविध भागातील आणखी तीघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एक रुग्ण हा मुंब्य्रातील अमृत नगर भागात आढळून आला आहे तर एक रुग्ण ठाण्यातील धोबी आळी भागातील तर तिसरा रुग्ण हा लोढा पॅराडाईज भागात आढळून आला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ही १६ झाली आहे. परंतु आता मुंब्य्रात पहिला रुग्ण आढळून आल्याने आता या भागात सर्तकता घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.                  गुरुवारी कळव्यातील एका वृध्दाचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला असतांना शुक्रवारी शहरातील लोढा पॅराडाईज, धोबी आळी आणि मुंब्य्रातील अमृत नगर भागातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. धोबी आळी भागातील ५७ वर्षीय व्यक्तीवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर लोढा पॅराडाईज येथील रुग्णावर देखील उपचार सुरु आहेत. तर मुंब्य्रातील गजबजलेल्या परिसरात आता कोरोनाने शिरकाव केला असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंब्रा हा अतिशय गजबजलेला परिसर आहे. या भागातील काही नागरीक हे दिल्लीला मरगज येथे गेले होते. परंतु त्यांचे रिपोर्ट हे निगेटीव्ह आले होते. परंतु आता मुंब्य्रातील अमृत नगर भागात राहणाऱ्या ४७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कोरोनाने मुंब्य्रात शिरकाव केला असल्याने येथे आता खरबदारीचे उपाय योजले जात आहेत. नागरीकांना खरबदारीच्या सुचना दिल्या जात आहेत. तसेच संबधींत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरीकांचा शोध पालिकेच्या माध्यमातून सुरु झाला असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या