शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

धमक्यांना घाबरून युवकाची आत्महत्या

By admin | Updated: February 21, 2017 04:05 IST

वांद्रे येथील एका व्यावसायिकाने केलेली मारहाण आणि डी कंपनीच्या नावे दिलेल्या धमक्यांना घाबरून ठाण्यातील एका युवकाने

ठाणे : वांद्रे येथील एका व्यावसायिकाने केलेली मारहाण आणि डी कंपनीच्या नावे दिलेल्या धमक्यांना घाबरून ठाण्यातील एका युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या युवकाचा मित्र व्यावसायिकाचे सुमारे ३० लाख रुपये घेऊन पळाला होता.वांद्रे येथील राजेश हरगुणानी यांनी जुन्या वाहनांच्या खरेदीविक्रीच्या व्यवसायासाठी ठाण्यातील बाळकुम परिसरातील विकासदत्त पांडे याला २९ लाख ४० हजार रुपये दिले होते. पैसे घेऊन पांडे फरार झाल्याने हरगुणानी यांनी शनिवारी ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानुसार, विकासदत्त पांडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. दरम्यान, ठाण्यातील लोकमान्यनगरात राहणारा कांतू गुडप्पा यादवंती (२८) याचा इंटरनेटचा व्यवसाय असून तो पांडेचा मित्र होता. विकासदत्त पांडे पैसे घेऊन फरार झाल्यानंतर, राजेश हरगुणानी यांनी पैशांसाठी कांतूला धमकावले. ४ फेब्रुवारी रोजी हरगुणानी यांनी ठाणे स्टेशनजवळील त्यांच्या कार्यालयात कांतूला बोलवून जबर मारहाण केली. डी कंपनीशी आपले थेट संबंध असून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी हरगुणानी यांनी कांतूला दिल्याचे त्याच्या वडिलांनी १६ फेब्रुवारी रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मारहाण आणि धमक्यांना घाबरून कांतूने १२ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोपही त्याच्या वडिलांनी केला आहे. हरगुणानी यांच्याकडून होत असलेल्या त्रासाबाबत कांतूने पोलिसांकडे तक्रार केली होती, असेही त्याच्या वडिलांनी म्हटले आहे. हरगुणानी यांच्या फसवणुकीच्या तक्रारीपासून उजेडात आलेल्या या प्रकरणाने कांतूच्या आत्महत्येने वेगळेच वळण घेतले आहे. दुसरीकडे विकासदत्त पांडे याचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. (प्रतिनिधी)पोलिसांना ठेवावा लागणार समन्वयहरगुणानी यांची फसवणुकीची तक्रार ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये, कांतूच्या आत्महत्येची तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये, तर विकासदत्त पांडे याच्या बेपत्ता होण्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात असल्याने तिन्ही तक्रारींच्या तपासात पोलिसांना समन्वय ठेवावा लागणार आहे.