शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम आरोग्यासाठी धावल्या हजारो महिला

By admin | Updated: March 20, 2017 02:05 IST

अगदी ४ महिन्याच्या तान्ह्या मुलींपासून ते ८४ वर्षाच्या वयोवृद्ध महिलांबरोबरच विशेष मुलींचा उत्स्फूर्त सहभाग, त्यातून त्यांनी

ठाणे : अगदी ४ महिन्याच्या तान्ह्या मुलींपासून ते ८४ वर्षाच्या वयोवृद्ध महिलांबरोबरच विशेष मुलींचा उत्स्फूर्त सहभाग, त्यातून त्यांनी उत्तम आरोग्यदायी जीवनशैलीचे पटवून दिलेले महत्त्व आणि त्यांना ठाणेकरांनी दिलेली उत्तम दाद अशा उत्साही वातावरणात दोस्ती ठाणे गोइंग पिंक रविवारी ठाण्यात झाली. ‘लोकमत’ त्याचे माध्यम प्रायोजक होते.आरोग्यदायी जीवनशैलीच्या महत्त्वाविषयी आणि स्तनाच्या कर्करोगासारख्या आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित उपक्रमाच्या पहिल्या पर्वाची सांगता या गोइंग पिंकने झाली. मिरॅकल मुंज अ‍ॅण्ड रनटास्टिक दिलसे व बोर्र्डिंग काईटस् एंटरटेनमेंटच्या सहयोगाने दोस्ती ठाणे गोइंग पिंक आयोजिली होती. सुपर मॉडेल, अभिनेता आणि पिंकेथॉनचा संस्थापक मिलिंद सोमण आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झेंडा दाखविल्यावर या गोइंग पिंकला सुरूवात झाली. २१ किमी, १० किमी., ५ किमी. आणि ३ किमी. अशा ४ गटांतील या स्पर्धेत विविध वयोगटातील सुमारे ४ हजार महिला सहभागी झाल्या होत्या. त्यात नवीन बाळांना जन्म दिलेल्या सुमारे २० मातांनीही आपल्या तान्ह्या बालकांसह साधारण ३ किमीचे अंतर चालत सहभाग नोंदविला. तर सुमारे ६० विशेष मुली आणि काही कॅन्सर पर्यवेक्षकही या पिंकमध्ये धावले. बाळकूम येथून या पिंकला सुरूवात होऊन ती कोलशेतमार्गे जाऊन पुन्हा बाळकूम येथेच तिची सांगता झाली. सक्षम महिलांद्वारे करण्यात येणाऱ्या चळवळीची ही सुरूवात आहे. सक्षम महिलांतूनच स्वस्थ परिवार, स्वस्थ देश आणि स्वस्थ जगाची सुरूवात होते. सक्षमीकरण ही स्वत:च स्वत:ला दिलेली देणगी आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार महिला, कॅन्सर पर्यवेक्षक, विशेष मुली या ठाणे गोइंग पिंकमध्ये उत्साहाने सहभागी झाल्याचा आनंद आहे, असे मत मिलिंद सोमण यांनी व्यक्त केले. वुमेन मॅरेथॉनच्या अनोख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य, स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्यादृष्टीने दोस्ती ठाणे गोइंग पिंक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे, याचे समाधान असल्याचे मत दोस्ती रिअ‍ॅलिटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक गोराडीया यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)