शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मेहतांच्या शाळेत इच्छुकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:22 IST

यादी जाहीर होत नसल्याने भाजपात अस्वस्थता असतानाच आमदार नरेंद्र मेहतांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेतून राजकीय हालचाली सुरु असल्याने

मीरा रोड : यादी जाहीर होत नसल्याने भाजपात अस्वस्थता असतानाच आमदार नरेंद्र मेहतांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेतून राजकीय हालचाली सुरु असल्याने इच्छुकांनी रात्री उशिरापर्यंत तेथे ठिय्या दिला होता. त्यामुळे नेमका कसा तोडगा काढावा यातच भाजपा नेते गुंतले होते. आयत्यावेळी प्रबाग बदलून काहींची वर्णी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.शांतीनगरच्या प्रभाग २० मध्ये भाजपाचे नगरसेवक असतानाही शिवसेनेच्या दळवी यांना घेतल्याने बंडाळी माजली. मेहतांचे समर्थक असणाºया दळवींना उमेदवारी भरण्यास सांगितल्याने भाजपा नगरसेवक दिनेश जैन यांनी बंडाचा झेंडा फडकवताच जैन यांना उमेदवारी देण्यात आली, तर हेतल परमार या अन्य उमेदवारांसह वाजत गाजत उमेदवारी अर्ज भरण्यास निवडणूक कार्यालयात गेल्या असता त्यांना शेवटच्या क्षणी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले. सुधीर कांबळी यांच्या पत्नीला परमार यांच्या जागी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले. शिवसेनेतून आलेल्या दळवींनाही अर्ज भरल्यावर दुसºया प्रभागात जाण्यास सांगण्यात आले. दळवींनी तर प्रभाग २० मध्ये प्रचारही सुरु केला होता. आता त्यांना प्रभाग १७ मधून अर्ज भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रशांत पालांडे यांच्यासमोर दळवींना उभे करुन मेहतांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे.प्रभाग १४ मध्ये भाजपात चुरस सुरु असुन अनिल भोसले की मीरादेवी यादव, असा पेच कायम आहे. भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग पाचमधून गटनेते शरद पाटील यांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे. आता नगरसेवक राकेश शहा यांचा पत्ता कट होण्याची चिन्हे आहेत. नगरसेविकांमध्ये वर्षा भानुशाली की मेघना रावल अशी स्पर्धा कायम आहे. प्रभाग दोनमधून भाजपा नगरसेविका कल्पना म्हात्रे यांना अजून अर्ज भरण्यास सांगितलेले नाही. त्यातच उत्तर भारतीय नगरसेवकाला उमेदवारी डावलली, असा प्रचार सोशल मीडियावर सुरु होताच भाजपाने मदनसिंह यांना अर्ज भरण्यास सांगितले. यामुळे नगरसेवक यशवंत कांगणेंचे भवितव्य अधांतरी आहे.प्रभाग सहामधून नगरसेवक डॉ. रमेश जैन यांना उमेदवारी नाकारुन नगरसेवक डॉ. राजेंद्र जैन यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. प्रभाग १३ मधून भाजपात नव्याने आलेल्या अनिता मुखर्जी यांचे नांव नक्की केल्याचे समजताच येथील अन्य महिला इच्छुकांनी पक्षनेत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.