शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ स्वागतकमानी विनापरवानगी उभारल्या

By admin | Updated: October 15, 2016 06:38 IST

नवरात्रोत्सवानिमित्ताने गायत्रीनगरमध्ये विनापरवानगी कमानी उभारल्या होत्या, असा गौप्यस्फोट प्रभाग समिती क्रमांक-१ चे सहायक आयुक्त अशोक लाडकर

पंढरीनाथ कुंभार / भिवंडीनवरात्रोत्सवानिमित्ताने गायत्रीनगरमध्ये विनापरवानगी कमानी उभारल्या होत्या, असा गौप्यस्फोट प्रभाग समिती क्रमांक-१ चे सहायक आयुक्त अशोक लाडकर यांनी केल्याने या घटनेला वेगळे वळण लागले आहे. दरम्यान, गायत्रीनगर पोली चौकीवर हल्ला करुन पोलीस उपनिरीक्षकाची दुचाकी जाळल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहरमनिमित्ताने किती ताजिया व पंजे बसले व किती परवानगी व विनापरवानगीचे आहेत, याची खातरजमा पोलिसांनी न केल्याने नियंत्रण कक्ष व विशेष शाखा यांच्यातील आकडेवारीत फरक आढळून येतो. त्यामुळे मन्सुरनगर व फातिमानगर येथून निघणाऱ्या ताजिया व पंजांची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यास नव्हती. त्यानुसार, या मिरवणुकीस पुरेसा बंदोबस्त दिलेला नव्हता. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.

गुरुवारी सायंकाळपर्यंत मन्सुरबाग व फातिमानगर येथून ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींची नावे, आकडेवारी रात्री ९ पर्यंत पोलीस नियंत्रण कक्ष व शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांना देता आली नाही. सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावताना त्यावर महापालिकेचा परवानगी क्रमांक, ठिकाण व मुदत ठळकपणे लिहिली पाहिजे. त्याचप्रमाणे बॅनर प्रिंटिंग करणाऱ्याचे, प्रकाशकाचे नाव बॅनरवर छापलेले नसल्याचे आढळल्यास पोलिसांनी अशा बॅनरवर कारवाई करावी, असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, अशी माहिती परवाना विभागप्रमुख ईश्वर आडेप यांनी दिली. बॅनर किंवा स्वागतकमानीस नियमानुसार फी घेऊन खाजगी व्यक्तीस, मंडळांना परवानगी दिली जाते असेही त्यांनी सांगितले.