शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ करदात्यांना प्रशासकीय दंड माफ करा - महापौर

By admin | Updated: December 8, 2015 00:20 IST

वेळेवर मालमत्ता कर न भरणाऱ्या करधारकांना प्रशासकीय कर लावून बिल लावण्यात आले आहे. गतवर्षी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार ३१ जानेवारीपर्यंत जे मिळकतधारक

ठाणे : वेळेवर मालमत्ता कर न भरणाऱ्या करधारकांना प्रशासकीय कर लावून बिल लावण्यात आले आहे. गतवर्षी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार ३१ जानेवारीपर्यंत जे मिळकतधारक थकीत मालमत्ता कर चालू आर्थिक वर्षाच्या मागणीसह संपूर्ण भरतील, त्यांना आकारलेला १०० टक्के प्रशासकीय दंड माफ करण्याबाबतची सूचना ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी मनपा प्रशासनाला केली आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही त्याच धोरणानुसार मोहीम राबवावी, अशी मागणी करून त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेत सादर करावा, असे महापौरांनी कळवले आहे.मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे व्हावी, या दृष्टिकोनातून जे मालमत्ताधारक ३१ जानेवारीपर्यंत देय होणारा थकीत मालमत्ता कर चालू आर्थिक वर्षात संपूर्ण भरतील, अशा मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीच्या मालमत्ता करावरील प्रशासकीय आकार १०० टक्के माफ करण्यात आला होता. महापालिकेच्या या योजनेस मालमत्ताधारकांनी उदंड प्रतिसाद देऊन जवळजवळ १७,८२९ इतक्या मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. जे मिळकतधारक २८ फेब्रुवारीपर्यंत थकीत मालमत्ता कर चालू आर्थिक वर्षाच्या मागणीसह अधिक प्रशासकीय आकाराच्या ३४ टक्के रक्कम भरतील, अशा मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीच्या मालमत्ता करावरील ६६ टक्के प्रशासकीय दंड माफ करण्यात आला होता. ३१ मार्चपर्यंत देय होणारा थकीत मालमत्ता कर, चालू आर्थिक वर्षाच्या मागणीसह अधिक ६७ टक्के भरतील, अशा मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीच्या मालमत्ता करावरील प्रशासकीय आकार ३३ टक्के माफ केला होता.जास्तीतजास्त मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरावा, यासाठी ही योजना प्रशासनाने अमलात आणली तर निश्चितच मालमत्ता करवसुली वेळेत होईल, असा विश्वास महापौरांनी वर्तवला आहे.या प्रकारच्या योजनेला मागील वर्षी उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर यंदाही ही योजना राबवावी.