शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख ठाणेकरांकडे लॅण्डलाइनसह ब्रॉडबॅण्ड

By admin | Updated: February 23, 2017 05:36 IST

मुंबई महानगरच्या खालोखाल असलेल्या ठाणे शहराची सातत्याने वाढ होत आहे. त्यातील

सुरेश लोखंडे /ठाणेमुंबई महानगरच्या खालोखाल असलेल्या ठाणे शहराची सातत्याने वाढ होत आहे. त्यातील प्रत्येकाच्या हातात नवनवीन मोबाइल दिसून येत आहे. मोबाइलच्या जमान्यातही आज दीड लाख ठाणेकरांच्या घरांत आणि कार्यालयांमध्ये एमटीएनएलचे लॅण्डलाइन (दूरध्वनी) खणखणत आहेत. ब्रॉडबॅण्डची अत्याधुनिक सेवाही ठाणेकरांना मिळत आहे.शहरातील कार्यालयांमध्ये लॅण्डलाइनचा वापर होणे, यात नवल नाही; परंतु एमटीएनएल आजही ठाणेकरांच्या पसंतीला आहे. विविध स्वरूपाच्या आॅफर देणाऱ्या शेकडो कंपन्यांच्या गॅलरी शहरात थाटलेल्या आहेत. त्या दररोज लाखो ग्राहकांना नवनवीन मॉडेलचे मोबाइल पुरवत आहेत; पण त्यातही लॅण्डलाइनसाठी नोंदणी करणारे ठाणेकर आजही आहेत. सध्या शहरात एक लाख पाच हजार २४७ दूरध्वनी आहेत, तर ४५ हजार ९३७ ब्रॉडबॅण्ड आणि ४७५ एफटीटीएच सेवा ठाणेकर ग्राहकांना दिली जात आहे, असे दिशा समितीच्या बैठकीत एमटीएनएलने अहवालाद्वारे स्पष्ट केले.मोबाइल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटरच्या काळात एमटीएनएल ग्राहकांना सेवा देण्यासाठी शहरात आघाडीवर आहे. दूरध्वनी या सेवेबरोबरच ठाणेकरांना उत्तम दर्जाच्या इंटरनेटची हायस्पीड सेवा पुरवण्यासाठी शहरात ठिकठिकाणी डिसलॅम नोड्स बसवण्यात आल्याचा दावा एमटीएनएलकडून करण्यात आलेला आहे. आधुनिक तंत्रप्र्रणालीतील एफटीटीएच ही सेवा घरगुती वापरासाठी शहरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. वर्षभरात सुमारे शंभरपेक्षा अधिक इमारतींमध्ये ती दिली जाणार आहे. त्यातील २५ इमारतींमध्ये ही सेवा कार्यरत झाल्याचे सांगितले जात आहे. नव्याने दोन हजार ५०० लॅण्डलाइन जोडण्या देण्याचे नियोजन केले आहे. ब्रॉडबॅण्ड इंटरनेटच्या अडीच हजार जोडण्या च्दोन हजार ५०० ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवेच्या जोडण्या करणार आहेत. त्यापैकी ७५ पेक्षा जास्त ग्राहकांना ही इंटरनेट सेवा दिली आहे. लॅण्डलाइन सेवा आणि हायस्पीड इंटरनेटची सुविधेच्या विस्तारासाठी सामारीन ग्रुप, दिवा आणि स्प्लेंडोरा येथे नवीन दूरध्वनी केंद्र लवकरच सुरू होणार आहे. एफटीटीएच सेवेच्या मागणीनुसार शहरात नव्याने डिसलॅम नोड्स बसवण्याची तयारी एमटीएनएलने दर्शवली आहे.