------
जिल्ह्यातील ग्रामीण भाग-
* अंबरनाथ तालुका: बदलापूर प. येथील बॅरेज डॅमजवळील व पाणवठाजवळील ठिकाण. मौजे चामटोली येथील पाणवठा, अनाथ आश्रमाजवळील परिसर.
* कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथील मधुबन सोसायटी परिसरातील सुयोगनगर, शास्त्रीनगर येथील चाळींचा परिसर, वडवली, अटाळी, वरप, कांबा येथे नदीचे पाणी वाढल्याने घरामध्ये पाणी शिरते. कांबा येथील मौर्यनगर एच. पी. पेट्रोल पंप. खडवली येथे भातसा नदीचे पाणी वाढल्याने किनाऱ्यावरील गावे. उल्हास नदीचे पाणी आजूबाजूच्या रस्त्यांवर व इमारतीमध्ये आले आहे. आपत्कालीन टीम हजर आहे. मोहने वायरजवळ उल्हास नदीची पातळी १९.८५ मीटर झाली. उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर आली असल्याने पंपिंग बंद केले. डोंबिवली पूर्व व पश्चिमचा भाग. कल्याण तालुक्यातील टिटवाळा, मांडा, खडवली कांबा, म्हारळ या भातसा व उल्हास नदीलगत व सखल भागात पाणी शिरते.
------
* शहापूर तालुका:
शहापूरमधील परांजपे नगर, चेरपोल परिसर, दीक्षा धाबा, गोठेघर, जिजामाता नगर, वासिंद, शेलवली, कासगाव, सुष्टी फार्म, टाटा हाउसिंग प्रिमायसेस, भातसई चाळ, कसारा परिसरातील डोंगरमाथ्यावरील लोकवस्त्या. कसारा घाट, चरीव गावात पाणी शिरते. सारंगपुरी, धसई नदी परिसर.